क्रिस्टियानो रोनाल्डो(फोटो-सोशल मीडिया)
Cristiano Ronaldo Football Style Shot: क्रिकेट हा भारत देशातील सर्वात लोकप्रिय खेळ असून भारतात या खेळाचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, सर्वजण दिवसभर रस्त्यावर बॅट आणि बॉलने खेळताना दिसून येतात. म्हणूनच देशात क्रिकेटसाठी अनेक प्रतिभावान खेळाडू पुढे आले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा जगात दबदबा आहे. या तुलनेत मात्र टेनिस, फुटबॉल, हॉकी आणि पोहण्यासाठी खेळाडू शोधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे. मात्र अशातच, एक बिहारी मुलगा फुटबॉल मैदानावर आपला खेळ खेळताना दिसून आला. विशेष म्हणजे त्या मुलाची तुलना थेट दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोसोबत होऊ लागली आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये स्थानिक मैदानावर फुटबॉल सामना खेळला जात असल्याचे दिसत आहे. जिथे खेळाडू उच्च दर्जाचे खेळ खेळताना दिसत आहेत. त्याची आक्रमक शैली तुम्हाला अर्जेंटिना आणि ब्राझील सारख्या देशांमधील सामन्यांची आठवण करून देणारी आहे. बहुतेक खेळाडू मैदानात उच्च दर्जाचे फुटबॉल खेळताना दिसत होते. दरम्यान, एका खेळाडूने हवेत उडी मारून पास गोलमध्ये मारला, अगदी ही सारे चित्र दिग्गज खेळाडू रोनाल्डोसारखे असेच होते. या खेळाडूला आता बिहारी रोनाल्डो म्हणून संबोधण्यात येत आहे.
Indian Ronaldo!
byu/Impressive-Guess6810 inincredible_indians
भारत देशात फुटबॉलमध्ये प्रतिभेचा खजिना असेलला दिसत आहे. अनेक प्रतिभावान खेळाडू स्थानिक स्पर्धांमध्ये खेळताना दिसतात. आता, हे खेळाडू सोशल मीडियाद्वारे समोर येऊ लागले आहेत. असे असून देखील प्रतिभावान खेळाडू लहान शहरे आणि खेड्यांमध्ये अस्तित्वात आहेत. त्यांना मोठ्या व्यासपीठावर प्रवेश देण्यात येत नसेल तर त्यांची आवड आणि कठोर परिश्रम निर्विवाद आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात २०२५-२६ च्या अॅशेस मालिकेमधील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जात आहे. हा सामना डे-नाईट टेस्ट म्हणून खेळला जात असून ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने डे-नाईट टेस्ट क्रिकेटमध्ये एक मोठा टप्प्याला गवसणी घातली आहे. डे-नाईट टेस्टमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. मार्नस लाबुशेनने फक्त १६ डावांमध्ये की किमया साधली आहे. लाबुशेनने डे-नाईट टेस्टमध्ये चार शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. २०१९ पासूनच्या सहा वर्षांत, डे-नाईट टेस्टमध्ये त्याची सरासरी ६६ पेक्षा जास्त राहिली आहे.






