Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसीम अक्रमचा ‘तो’ विश्वविक्रम माहितीये का? अद्याप एकाही गोलंदाजाला जमलेली नाही अशी कामगिरी

पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रमने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ८८१ विकेट्स घेतल्या आहेत. भविष्यात त्याचा हा विश्वविक्रम जो कुणी मोडून काढेल तो  क्रिकेट इतिहासात कायमचा अमर होऊ शकतो. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 25, 2025 | 04:58 PM
Do you know Wasim Akram's 'that' world record? A feat that no bowler has achieved yet

Do you know Wasim Akram's 'that' world record? A feat that no bowler has achieved yet

Follow Us
Close
Follow Us:

Wasim Akram’s world record : क्रिकेट इतिहासात असे अनेक विक्रम होऊन गेले आहेत, की त्यांना मोडणे अशक्य मानले जात आले आहेत. जर आपण उदाहरणा दाखल सांगायचे झाले तर श्रीलंकेचा महान फ्रिकीपटू मुथय्या मुरलीधरनचे कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी टिपले आहेत. त्याचा हा एक विश्वविक्रम आहे. हा विक्रम मोडणे अशक्यप्राय मानला जातो. पण आपण पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रमचा असाच एक विश्वविक्रम आहे, ज्याला भविष्यात मोडणे अशक्य वाटत आहे. परंतु, भविष्यात जर कुण्या गोलंदाजाने विश्वविक्रम मोडीत काढला तर मात्र त्या गोलंदाजाचे नाव क्रिकेट इतिहासात कायमचे अमर होऊ शकते.

वसीम अक्रममचा विश्वविक्रम कोणता?

पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने त्याच्या दीर्घ गौरवशाली कारकिर्दीमधील लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ८८१ बळी टिपले आहेत. हा आकडा एक विश्वविक्रम आहे. कारण आजपर्यंत इतर कोणताही गोलंदाज ७०० बळींचा टप्पा गाठू शकलेला नाही.  हा विक्रम साध्य करण्यासाठी केवळ दीर्घ कारकिर्दीच नव्हे तर तंदुरुस्तीसह कामगिरीतील सातत्य देखील आवश्यक असणार आहे.

हेही वाचा : Pujara Retirement : ‘त्याला संघात राहू द्यायला हवं होतं…’, Cheteshwar Pujara च्या निवृत्तीवर शशी थरूर यांची भावुक पोस्ट

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

  1. वसीम अक्रम – ८८१ विकेट्स
  2. अ‍ॅलन डोनाल्ड – ६८४ विकेट्स
  3. मुतिया मुरलीधरन – ६८२ विकेट्स
  4. जॉन लिव्हर – ६७४ विकेट्स
  5. वकार युनूस – ६७४ विकेट्स

लिस्ट एची आकडेवारीकडे बघता सध्या तरी हे स्पष्टपणे दिसते की, वसिम अक्रमचा हा विक्रम पूर्णपणे सुरक्षित आहे. पाकिस्तानच्या या दिग्गज अक्रमला ‘स्विंगचा सुलतान’ म्हणून ओळखले जाते. नवीन चेंडूने त्याचे इनस्विंग-आउटस्विंग आणि जुन्या चेंडूने रिव्हर्स स्विंग फलंदाजांना गोंधळात टाकणारे असायचे. यामुळेच वसिम अक्रमला क्रिकेट इतिहासातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जाते.

वसिम अक्रमने त्याच्या कारकिर्दीत ५९४ लिस्ट-ए सामन्यांमध्ये ३४ वेळा ४ बळी आणि १२ वेळा ५ बळी टिपण्याची किमया साधली आहे. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ३.८९ इतका होता. इतका वेळ तंदुरुस्त राहून खेळात सातत्य दाखवत वेगवान गोलंदाजाने अशी कामगिरी करणे दुर्मिळ असे मानले जात आहे.  वसीम अक्रम केवळ देशांतर्गत क्रिकेटपुरता मर्यादित नसून त्याने पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९१६ बळी घेण्याची कामगिरी केली आहे. तो पाकिस्तानचा क्रमांक १ चा गोलंदाज आहे.

हेही वाचा : ‘एकदिवसीय क्रिकेट थांबवा, ऑलिंपिकवर लक्ष द्या…’, ललित मोदींचा ICC ला अजब सल्ला; पहा VIDEO

वसिम अक्रमने १९८५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केले होते. अक्रमने त्याच वर्षी १८ वर्षे २१५ दिवसांच्या वयात कसोटी सामन्यात १० बळी घेण्याचा भीम पराक्रम केला होता.  नंतर बांगलादेशच्या अनामुल हक ज्युनियरने हा विक्रम मोडीत काढला होता.

Web Title: Wasim akrams world record in list a cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 03:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.