ललित मोदी(फोटो-सोशल मीडिया)
Lalit Modi’s advice to ICC : आयपीएलचे माजी अध्यक्ष राहिलेले ललित मोदी क्रिकेट जगतापासून दूर आहेत, तरी देखील ते चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेचा विषय बनले आहेत. यावेळी त्यांची चर्चा एकदिवसीय क्रिकेटवरील त्यांच्या विधानाबाबत होत आहे. यावेळी ललित मोदी यांनी क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी आता थेट आयसीसीसमोर एक प्रस्ताव देखील मांडला आहे.
एक गोष्ट उल्लेखनीय आहे की, जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा भारतात आणण्याचे श्रेय ललित मोदी यांच्याकडे जाते. जी आता जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून नावारूपाला आली आहे. ललित मोदी ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार मायकेल क्लार्कसोबत बोलत असताना त्याने आयसीसीला ही सूचना केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कसोबत बोलताना ललित मोदी म्हणाले की, “जर कसोटी क्रिकेट दिवसा खेळला गेला तर ते वाईट होण्याची शक्यता आहे. माझा विश्वास आहे की त्यांनी एकदिवसीय क्रिकेट पूर्णपणे बंद करून टाकावे, तर कसोटी आणि टी-२० सामन्यांसाठी द्विपक्षीय मालिका आयोजित करण्यात यावी.”
मोदी पुढे बोलताना म्हणाले की, “तुम्ही हंगाम कमी करू शकता. लोकांची आता पूर्वीसारखी आठ तास बाहेर जाऊन बसण्याची क्षमता नाही. त्यामुळे स्टेडियम दररोज भरले जाऊ शकत नाही. मी म्हणतोय की कसोटी सामना दुपारी दोन वाजता खेळवायला सुरवात करायला पाहिजे.”
पुढे मोदी म्हणाले की, “विश्वचषकांची संख्या कमी करण्यात यावी आणि ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित करायला हवे.” तसेच ते म्हणाले की, “तुम्ही विश्वचषकांची संख्या कमी करू शकता. विश्वचषक दर 4 वर्षांनी होतो. तुम्ही ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित करयला पाहिजे. जगभरात कसोटी विश्व मालिका आयोजित करायला पाहिजे. एकदिवसीय सामन्यांवर तुमचे पैसे खर्च करू नका. त्यामध्ये काही एक अर्थ नाही.”
ललित मोदींनी भारतात आयपीएलसारखी मोठी क्रिकेट लीग सुरू केली. त्यामुळे क्रिकेटची दिशा आणि स्थिती या दोन्हीमध्ये बदल झाला. आज आयपीएलमुळे भारतीय क्रिकेट इतर क्रिकेट राष्ट्रांच्या तुलनेत खूप पुढे गेलेले आपल्याला दिसत आहे. अशा परिस्थितीत, अनेक लोक म्हणतात की आयसीसीला त्यांचा सल्ला अवडण्याची शक्यता आहे. आयसीसी शक्य तितक्या सर्व प्रकारे क्रिकेटला चांगले बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.