
IND vs WI ODI Series: टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ भारतात दाखल झाला आहे. कॅरेबियन खेळाडू 2 दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर अहमदाबादला पोहोचले. सर्व खेळाडू मालिकेच्या आधी 3 दिवस क्वारंटाईनमध्ये असतील.
भारतीय खेळाडू अहमदाबादला पोहोचले आहेत.
६ ते १५ फेब्रुवारी दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज (Ind vs WI) यांच्यात मर्यादित षटकांचे ६ सामने खेळवले जातील. ३ T20 आणि ३ ODI सामने होतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही देशांमधील तीन वनडे सामने होणार आहेत. त्याच वेळी, सर्व T20 सामने कोलकाताच्या ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
अहमदाबादमध्ये स्टेडियम रिकामे राहणार आहे
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेत प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी असेल. तिन्ही सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जातील. गुजरात क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली. अहमदाबादमधील कोरोनाची प्रकरणे पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कोलकाता येथे होणाऱ्या T20 सामन्यांमध्ये ७५% प्रेक्षकांना ईडन गार्डन्सवर सामना पाहण्याची परवानगी असेल.
एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघ:
भारतीय वनडे संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल , कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.
वेस्ट इंडिज वनडे संघ: किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, केमार रोच, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श जूनियर.