नवी दिल्ली : संजय सिंग यांना भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बनून अवघे २४ तास झाले आहेत. मात्र, याला सातत्याने विरोध होत आहे. संजय सिंग हे माजी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांचे निकटवर्तीय मानले जातात. अध्यक्ष बनल्यानंतर काही तासांतच साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली होती. आता ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मैं अपना पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्री जी को वापस लौटा रहा हूँ. कहने के लिए बस मेरा यह पत्र है. यही मेरी स्टेटमेंट है। 🙏🏽 pic.twitter.com/PYfA9KhUg9
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) December 22, 2023
बजरंगने पंतप्रधानांना पत्र लिहिले
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या बजरंग पुनियाने सोशल मीडियावर पोस्ट करत पुरस्कार परत केल्याची घोषणा केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. पत्र शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे. हे फक्त माझे पत्र म्हणायचे आहे. हे माझे विधान आहे.