भारत विरुद्ध कुवेत : आजचा दिवस भारतीय फुटबॉल विश्वासाठी त्याचबरोबर भारतासाठी सुद्दा ऐतिहासिक दिवस आहे. आज भारताचा फुटबॉल संघ गुरुवारी ६ जून रोजी कुवेतविरुद्ध ( India vs Kuwait) मैदानात उतरणार आहे. हा सामना टीम इंडियाचा कर्णधार सुनील छेत्रीचा (Sunil Chhetri) शेवटचा सामना असणार आहे. कर्णधार सुनील छेत्रीने त्यांच्या निवृत्तीची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. हा सामना कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर होणार आहे. भारतासाठीही हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यातील विजयामुळे टीम इंडियाची FIFA विश्वचषक-2026 पात्रता फेरीच्या पुढील फेरीत जाण्याची शक्यता आणखी मजबूत होईल. (फोटो सौजन्य – जिओ सिनेमा इंस्टाग्राम अकाउंट)
[read_also content=”Breaking: ओमानची बिकट अवस्था, ऑस्ट्रेलियाने मिळवला 39 धावांनी विजय https://www.navarashtra.com/sports/t20-world-cup-aus-vs-oman-10th-match-group-b-australia-won-by-39-runs-543435.html”]
भारताच्या संघाने याआधी कुवेतविरुद्ध सामना खेळाला होता. त्यांनतर भारताने अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळाला हा सामना अनिर्णयीत राहिला. आता हा संघ कुवेतविरुद्धचा पराभव सहन करू शकत नाही. संघालाही आपल्या कर्णधाराला विजयी निरोप द्यायचा आहे. ही टीम इंडिया आव्हानात्मक स्थितीत आहे. सहा सामने खेळल्यानंतर फक्त दोनच संघ तिसऱ्या फेरीत जाणार आहेत. या सामन्याचा ऐतिहासिक सामना कधी आणि कुठे पाहायचा यासंदर्भात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कुठे आणि कधी पाहायचा भारत विरुद्ध कुवेत सामना?
भारत आणि कुवेत यांच्यातील ऐतिहासिक सामना गुरुवार, ६ जून रोजी होणार आहे. हा सामना कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. स्पोर्ट्स 18 चॅनलवर टीव्हीवर या सामन्याचा आनंद घेता येईल. त्याचबरोबर या सामन्याचे ऑनलाईन स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲपवर तुम्ही भारत आणि कुवेत मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता