फोटो सौजन्य - सोशल मीडिया
दिल्ली प्रीमियर लीग : भारतामधील इंडियन प्रीमियर लीगची क्रेझ फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये पसरली आहे. त्यामुळे आता प्रत्येक राज्यांनी त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या T20 लीग सुरू केल्या आहेत. त्या लीगला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आता या यादीत राष्ट्रीय राजधानीचे नावही जोडले गेले आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन आता स्वतःची T20 लीग घेऊन येत आहे. दिल्ली प्रीमियर लीग १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या लीगचा पहिला सामना १७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सामना जुनी दिल्ली-6 आणि दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे अनुभवी खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
पहिल्याच सामन्यात इशांत शर्मा आणि रिषभ पंत सारखे खेळाडू खेतान दिसणार आहेत. रिषभ पंत असल्यामुळे नक्कीच क्रिकेट प्रेमींना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे. या सामान्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा – मनु भाकरवर पैशांचा पाऊस! मिळाला 10 लाखांचा धनादेश, खेळाडू कोट्यवधींची मालकीण
दिल्ली प्रीमियर लीगचा पहिला सामना जुनी दिल्ली-6 आणि दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स यांच्यामध्ये रंगणार आहे. हा पहिला सामना अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. जुनी दिल्ली-6 आणि दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स यांच्यातील पहिला सामना रात्री 8.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे लाईव्ह थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 चॅनेलवर क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग JIO Cinema वर पाहायला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वीच दुलीप ट्रॉफीच्या संघाची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक भारतीय क्रिकेट संघाचे अनुभवी खेळाडू खेळताना दिसणार आहेत. यामध्ये रिषभ पंत, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर हे खेळाडू दुलीप ट्रॉफीसाठी खेळातील.