MS Dhoni Birthday special: Who are MS Dhoni's 'those' 7 special people? With whom he celebrated his 44th birthday; Watch the video
Happy Birthday MS Dhoni : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आज ७ जुलै २०२५ रोजी त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवशी जगभरातून त्याच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतासह संपूर्ण जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या एमएस धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी झाला. आता भारताचा हा माही ४४ वर्षांचा झाला आहे. अशा परिस्थितीत, त्याचे चाहते देशभरातील माहीचा वाढदिवस साजरा करताना दिसून येत आहे.
देशभरातून धोनीचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. अशातच धोनी त्याचा वाढदिवस कसा साजरा करताना दिसून आलाया आहे. त्याच्यासोबत खास ७ लोक देखील दिसत आहेत. त्याच्या वाढदिवस साजरा करतेवेळीचा एक व्हिडिओ देखील साजरा होत आहे. धोनी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मूळ गावी रांचीमध्ये आहे. येथे त्याने ७ लोकांसोबत आपल्या वाढदिवसाचा केके कापला आहे. आता लोकांना प्रश्न पडला आहे की ते ७ लोक कोण आहेत? त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
एमएस धोनीचा जर्सी नंबर ७ आहे. विशेष म्हणजे त्याच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त त्याच्यासोबत ७ लोक दिसून येत आहेत. त्याचा हा व्हिडिओ रांचीच्या जेएससीए स्टेडियममधील असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त केक कापताना दिसून येत आहे. या दरम्यान, त्याच्यासोबत आणखी ७ लोक देखील असल्याचे दिसत आहेत. जे या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये त्याच्यासोबत सहभागी आहेत. हे सात लोक प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीसारखे दिसत नाहीत. हे धोनीच्या आजूबाजूचे लोक असून जे नेहमीच धोनीसोबत जोडलेले असतात. धोनी या लोकांना खूप जवळून ओळखतो आणि तो त्यांच्या घरी देखील जा असतो.
MS Dhoni celebrating his 44th Birthday 😍❤️ pic.twitter.com/SYVATE9FUG
— ` (@WorshipDhoni) July 7, 2025
महेंद्रसिंग धोनी हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाने शानदार कामगिरी करत अनेक वर्षांनी आयसीसी ट्रॉफीला गवसणी घातली होती. धोनीच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाने तीन आयसीसी ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली आहे. यामध्ये २००७ चा टी२० वर्ल्ड कप, २०११ चा एकदिवसीय वर्ल्ड कप आणि २०१३ चा चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. याशिवाय धोनीने चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमध्ये ५ वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे.
हेही वाचा : IND vs ENG : दहा विकेट घेतल्यानंतर आकाशदीपने विजयाचे श्रेय दिलं त्याच्या खास व्यक्तीला, Video Viral
महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियासाठी एकूण ९० कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ३०.०९ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ६ शतके आणि ३३ अर्धशतके ठोकली आहेत. त्याच वेळी, त्याने ३५० एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. धोनीने ९८ टी-२० सामन्यांमध्ये १६१७ धावा फटकावल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीने २३ डिसेंबर २००४ रोजी बांगलादेशविरुद्ध पदार्पण केले होते तर १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.