Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WI vs IRE : वेस्ट इंडिजच्या ‘या’ खेळाडूचा भीम पराक्रम! AB de Villiers च्या विश्वविक्रमाशी साधली बरोबरी, वाचा सविस्तर.. 

आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा फलंदाज मॅथ्यू फोर्डने एक भीम पराक्रम केला आहे. त्याने एबी डिव्हिलियर्सच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 24, 2025 | 10:20 AM
WI vs IRE: Amazing feat of 'this' West Indies player! Equals AB de Villiers' world record, read in detail..

WI vs IRE: Amazing feat of 'this' West Indies player! Equals AB de Villiers' world record, read in detail..

Follow Us
Close
Follow Us:

WI vs IRE  : आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील दूसरा सामना खेळवण्यात आला. या एकदिवसीय सामन्यात  वेस्ट इंडिजचा फलंदाज मॅथ्यू फोर्डने एक भीम पराक्रम केला आहे.  मॅथ्यू फोर्डने सर्वात जलद अर्धशतकाच्या एबी डिव्हिलियर्सच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे. फोर्डने अवघ्या १६ चेंडूंचा सामना करत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि एक इतिहास आपल्या नावे केला. तो सर्वात जलद  अर्धशतक झळकवणारा संयुक्त पहिला फलंदाज ठरला आहे.

२३ वर्षीय क्रिकेटपटू फोर्ड ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला मैदानात आला. त्याने फक्त १६ चेंडूत ५० धावांचा टप्पा गाठला. याआधी  १८ जानेवारी २०१५ रोजी जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून एबी डिव्हिलियर्सने १६ चेंडूत अर्धशतक झळकावून विश्वविक्रम केला होता. त्या सामन्यात एबीडीने फक्त ४४ चेंडूत १४९ धावा चोपल्या होत्या.

हेही वाचा : PBKS vs DC : आज पंजाब किंग्जचे लक्ष प्लेऑफच्या पहिल्या स्थानावर, तर दिल्ली प्रतिष्ठा राखण्यासाठी उतरेल मैदानात..

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने आयर्लंडविरुद्ध ८ विकेटच्या मोबदल्यात ३५२ धावांचा डोंगर उभारला.  यादरम्यान, फोर्डने अखेर १९ चेंडूंचा सामना करत ५८ धावा केल्या. त्यामध्ये त्याने २ चौकार आणि ८ षटकार लगावले.  फोर्ड याने यावेळी  जस्टिन ग्रीव्हज (३६ चेंडूत ४४) सोबत सातव्या विकेटसाठी २५ चेंडूत ६८ धावांची भागीदारी रचली.

फोर्डच्या आधी, वेस्ट इंडिजकडून एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर जमा होता. २ मार्च २०१९ रोजी ग्रोस आयलेट येथे इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात गेलने वेस्ट इंडिजसाठी फक्त १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते.

हेही वाचा : IND Vs ENG : भारतीय कसोटी संघाचा प्रश्न मिटला! कोहलीच्या जागी ‘हा’ खेळाडू पुढे, क्रमांक-४ वर करेल फलंदाजी..

MATHEW FORDE EQUALLED AB DE VILLIERS’ FASTEST ODI FIFTY RECORD.

– A half century in 16 balls. 🤯pic.twitter.com/sxD2EpLX9P

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 23, 2025

वेस्ट इंडिजसाठी सर्वात जलद एकदिवसीय अर्धशतक करणारे फलंदाज

  1. मॅथ्यू फोर्ड – १६ चेंडू विरुद्ध आयर्लंड, २०२५
  2. ख्रिस गेल – १९ चेंडू विरुद्ध इंग्लंड, २०१९
  3. डॅरेन सॅमी – २० चेंडू विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१०
  4. ब्रायन लारा – २३ चेंडू विरुद्ध कॅनडा, २००३
  5. किरॉन पोलार्ड – २३ चेंडू विरुद्ध नेदरलँड्स, २०११

शुक्रवारी झालेल्या आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात  वेस्ट इंडिजसाठी फोर्ड व्यतिरिक्त, केसी कार्टीनेही आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. सेंट मार्टिन या २८ वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजील येऊन करताना १०९ चेंडूत १०२ धावा केल्या आहेत.  या खेळीत त्याने १३ चौकार आणि १ षटकार लगावला आहे.

Web Title: Wi vs ire west indies matthew fords incredible feat equals ab de villiers world record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • AB de Villiers

संबंधित बातम्या

WCL 2025 : 6 सामन्ये, 3 शतके… AB de Villiers ची बरोबरी करणं कठीण! संघासाठी लकी; वयाच्या 41 व्या वर्षीही चर्चेत
1

WCL 2025 : 6 सामन्ये, 3 शतके… AB de Villiers ची बरोबरी करणं कठीण! संघासाठी लकी; वयाच्या 41 व्या वर्षीही चर्चेत

साऊथ आफ्रिका चॅम्पियन्सने पाकिस्तानला पाजलं पाणी! WCL 2025 फायनलच्या सामन्यात 9 विकेट्सने केले पराभूत
2

साऊथ आफ्रिका चॅम्पियन्सने पाकिस्तानला पाजलं पाणी! WCL 2025 फायनलच्या सामन्यात 9 विकेट्सने केले पराभूत

SA vs AUS : एबी डिव्हिलियर्सचा संघ अंतिम फेरीत, ऑस्ट्रेलियाचा 1 धावेने केला पराभव
3

SA vs AUS : एबी डिव्हिलियर्सचा संघ अंतिम फेरीत, ऑस्ट्रेलियाचा 1 धावेने केला पराभव

WCL 2025 : Mr 360 ने दाखवला जलवा, एबी डिव्हिलियर्सने पुन्हा एकदा घातला धुमाकूळ! 41 चेंडूत शतक झळकावले
4

WCL 2025 : Mr 360 ने दाखवला जलवा, एबी डिव्हिलियर्सने पुन्हा एकदा घातला धुमाकूळ! 41 चेंडूत शतक झळकावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.