भारतीय कसोटी संघ(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs ENG : भारतीय संघ आयपीएल २०२५ संपल्यानंतर पुढील महिन्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. हा दौरा २० जूनपासून सुरू होणार आहे. पहिला सामना लीड्समध्ये खेळवण्यात येणारहया आहे. या दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या कसोटी मालिकेत या अनुभवी दोन्ही दिग्गजांची उणीव भासणार आहे.
रोहितच्या निवृत्तीनंतर, केएल राहुल हा सलामीसाठी पहिला पर्याय आहे. आता तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या कसोटी मालिकेप्रमाणेच आता कोहलीच्या निवृत्तीनंतर कसोटीत भारतासाठी क्रमांक ४ वर फलंदाजी करणारा खेळाडू कोण असणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, २५ वर्षीय फलंदाज शुभमन गिल आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होण्याच्या स्पर्धेत देखील त्याचे नाव घेतले जात आहे. तो या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याचे बोलले जाता आहे. गिलने आजपर्यंत कसोटीत चौथ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी केलेली नाही. कदाचित कर्णधार झाल्यानंतर त्याच्या भूमिकेत बदल होऊ शकतो. तो आता संघासाठी एक नवीन भूमिका बजावण्यास सज्ज झाला आहे.
आयपीएल २०२५ मध्ये, गिल गुजरात टायटन्सकडून सलामीवीर म्हणून खेळत असून स्पर्धेत त्याने आपल्य फलंदाजीने सर्वांना अवाक केले आहे. अहमदाबादस्थित फ्रँचायझीसाठी गिलने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये ६३६ धावा कुटल्या आहेत. आता, शुभमन गिलला नंबर-४ किती आवडतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. जर गिल ४ व्या क्रमांकावर खेळला तर त्याच्या जागी ३ व्या क्रमांकावर कोण खेळेल? असा प्रश्न उपस्थित होता आहे. याबद्दल देखील काही विचारमंथन सुरू असल्याचे बोलले जात आहे.
एका वृत्तानुसार, शमीकडून कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक असलेला वर्कलोड तयार करण्यात आला नाही. २३ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध एसआरएच सामन्यापूर्वी शमीची तपासणी करण्यासाठी बीसीसीआयच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या एका सदस्याकडून या आठवड्यात लखनौला भेट देण्यात आली. निवडकर्त्यांनी त्यांचा निर्णय अद्याप घेतला की नाही, याबाबत माहिती नाही. परंतु ते शमीला इंग्लंडला घेऊन जाणार नाहीत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा : RCB vs SRH : ज्याला टीम इंडियाने दाखवला बाहेरचा रस्ता, त्या Bhuvaneshwar Kumar ने रचला इतिहास; वाचा सविस्तर…
७ ते ११ जून २०२३ दरम्यान ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम सामन्यात खेळल्यानंतर शमी भारताकडून एकही कसोटी सामना खेळलेला नाही. सद्या त्याचा फॉर्म देखील चांगला नसल्याची माहिती आहे. जर शमीला संघात स्थान देण्यात आले नाही तर, सिराज संघात परतण्याची शक्यता आहे.