आकाश चोप्रा : इंडियन प्रीमियर लीग 2024 एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या संघांमध्ये होणार आहे. हा सामना 22 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यांमध्ये जो संघ जिंकेल तोच संघ पुढे जाईल आणि ज्या संघाचा पराभव होईल तो संघ शर्यतीतून बाहेर होईल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. ज्या दोन्ही संघानी ज्याप्रकारे प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे ते पाहता नक्कीच तुम्ही संघ चकित व्हाल.
[read_also content=”विराट कोहलीने ख्रिस गेलला दिली खास भेटवस्तू https://www.navarashtra.com/sports/virat-kohli-gave-a-special-gift-to-chris-gayle-535488.html”]
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आयपीएलच्या मे महिन्यात एकही सामना गमावला नाही तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या संघाने एकही सामना मे महिन्यामध्ये जिंकलेला नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्ससमोर फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असणार आहे. या सामन्यांमध्ये ज्या संघाचा विजय होईल तो संघ क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेल्या संघाशी सामना करावा लागणार आहे.
क्वालिफायर 1
क्वालिफायर 1 चा सामना 21 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यात ज्या संघाचा विजय होईल तो संघ थेट अंतिम फेरीचा सामना खेळणार आहे. तर या सामन्यांमध्ये ज्या संघाचा पराभव होईल त्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे तो संघ एलिमिनेटर सामन्यांमध्ये विजय झालेल्या संघाशी सामना करणार आहे.
[read_also content=”आयपीएलचा 70 वा सामना रद्द.. या संघाला झाला संघाला झाला मोठा फायदा https://www.navarashtra.com/sports/70th-match-of-ipl-cancelled-srh-vs-kkr-ipl-2024-rcb-vs-rr-535565.html”]
काय म्हणाला आकाश चोप्रा?
एलिमिनेटर सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वरचष्मा असेल असे आकाश चोप्राने वक्तव्य केले आहे. आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, ‘एक एक करून सर्व काही आरसीबीच्या बाजूने जात आहे, कारण सनरायझर्स हैदराबाद धोकादायक संघ आहे. आरसीबी त्यांना पराभूत करू शकत नाही असे नाही, सत्य हे आहे की सनरायझर्स हैदराबादला आरसीबीने त्यांच्या मैदानावर पराभूत केले आहे. सत्य हे आहे की त्या दिवशी सामना कोणाच्याही बाजूने जाऊ शकला असता. मला वाटते की राजस्थान रॉयल्सविरुद्ध आरसीबीचा वरचष्मा असेल.
एलिमिनेटर खेळणाऱ्या संघाने आयपीएलचे जेतेपद पटकावल्याचे 11 वर्षांत फक्त एकदाच घडले आहे, 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादने विजेतेपद पटकावले आहे. याचा उल्लेख करून आकाश चोप्रा म्हणाला, ‘आरसीबी चांगल्या स्थितीत आहे.’ आयपीएल 2024 च्या शेवटी राजस्थान रॉयल्सच्या खराब फॉर्मचा संदर्भ देताना चोप्रा म्हणाले, राजस्थान रॉयल्सचा शेवटचा लीग सामना धोक्यात आला आणि त्यांना 18 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली नाही. पण सत्य हे आहे की या संघाने मे महिन्यात एकही सामना जिंकलेला नाही. पहिल्या नऊ सामन्यांतील आठ विजयानंतर राजस्थान रॉयल्सने एकही सामना जिंकलेला नाही. राजस्थान रॉयल्सला चार संधी मिळाल्या, पण राजस्थान रॉयल्सला विजय नोंदवता आला नाही असे आकाश चोप्रा म्हणाला.