मुंबई : सप्टेंबर महिन्यात झालेल्या पुरूष आशिया चषकानंतर येत्या १ ऑक्टोबर पासून महिला आशिया चषक (Womens Asia Cup ) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदा या स्पर्धेचे यजमानपद बांग्लादेशला मिळाले असून यंदा ही स्पर्धा बांगलादेशमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत ७ देशांचे संघ सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी बहुतेक देशांनी आपपल्या संघाची घोषणा केली आहे.
१ ऑक्टोबर रोजी स्पर्धेतील पहिला सामना बांग्लादेश (Bangladesh) आणि थायलंड (Thailand) यांच्यात खेळला जाणार आहे. तर, १५ ऑक्टोबरला या स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत भारतीय संघाची देखील घोषणा झाली असून भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हरमनप्रीत कौर कडे सोपवण्यात आली आहे. तर, स्मृती मानधनाच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी असेल. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, मलेशिया, थायलंड, यूएई, बांग्लादेश इत्यादी संघ सहभाग घेणार आहेत. यापैकी भारत पाकिस्तान, श्रीलंका, आणि मलेशियाचा संघ जाहीर झाला असून थायलंड, यूएई, बांग्लादेश या देशांनी अजून आपले संघ जाहीर केलेले नाहीत.
भारतीय संघ-
हरमनप्रीत (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सबिनेनी मेघना, रिचा घोष (विकेटकिपर), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंह, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, यादव, के.पी.नवगिरे.
राखीव खेळाडू- तानिया सपना भाटिया, सिमरन दिल बहादूर
पाकिस्तान संघ-
बिस्माह मरूफ (कर्णधार), ऐमान अनवर, आलिया रियाज, आयशा नसीम, डायना बेग, फातिमा सना, कायनात इम्तियाज, मुनीबा अली (विकेटकीपर), निदा डार, ओमेमा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिदरा अमीन, सिदरा नवाज (विकेटकीपर), तुबा हसन.
राखीव खेळाडू-नैशरा संधू, नतालिया परवेज, उम्मे हानी, वहीदा अख्तर.
श्रीलंकेचा संघ-
चमारी अथापथु (कर्णधार), हसीनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, कवीशा दिलहारी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), कौशानी नुथ्यंगना, ओशादी रणसिंघे, मालशा शेहानी, मदुशिका मेथथानंद, इनोका रणवीरा, रश्मि सिल्वा, सुगंधिका कुमारी, अचनी कुलाहारिका सेवंडी
मलेशियाचा संघ-
विनिफ्रेड दुरईसिंगम (कर्णधार), मास एलिसा (उप-कर्णधार), साशा आज़मी, ऐसा एलीसा, आइना हमीज़ा हाशिम, एल्सा हंटर, जमहीदया इंतान, माहिरा इज्जती इस्माइल, वान जूलिया (विकेटकीपर), धनुसरी मुहुनन, आइना नजवा (विकेटकीपर), नुरिल्या नतास्या, नूर अरियाना नात्स्या, नूर दनिया स्यूहादा, नूर हयाती जकारिया.






