Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Junior Hockey World Cup : भारताची तलवार म्यान! स्पेनकडून पराभवानंतर भारतीय संघाला १० व्या स्थानावर मानावे लागले समाधान 

ज्युनियर महिला हॉकी विश्वचषकातील भारतीय महिला संघाला स्पेनने पराभूत केले. या पराभवासोबत भारतीय महिला हॉकी संघाला ज्युनियर हॉकी विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. या पराभवामुळे भारताला १० व्या स्थानावर राहावे लागले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 12, 2025 | 02:13 PM
Women's Junior Hockey World Cup: India's sword sheathed! After defeat to Spain, Indian team had to settle for 10th place

Women's Junior Hockey World Cup: India's sword sheathed! After defeat to Spain, Indian team had to settle for 10th place

Follow Us
Close
Follow Us:

Women’s Junior Hockey World Cup : स्पेनकडून पराभव झाल्यानंतर ज्युनियर महिला हॉकी विश्वचषकातील भारतीय महिला संघाचे आव्हान संपुष्टात आला. ज्युनियर हॉकी विश्वचषकात भारतीय महिला हॉकी संघाला स्पेनने पराभूत केले. या पराभवामुळे भारतीय संघाला स्पर्धेत एकूण १० व्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पेनकडून भारतीय संघ २-१ असा पराभूत झाला. भारतीय संघाकडून कनिका सिवाचला (४१’) ने एकमेव गोल करता आला.तर स्पेनकडून नतालिया विलानोवा (१६’) आणि एस्थर कॅनालेस (३६’) यांनी गोल डागले.

हेही वाचा : IND vs UAE : 6,6,6,6,6,6,6,6,6… वैभव सुर्यवंशीची जादू दुबईच्या मैदानात, झळकावले शतक

पहिला क्वार्टर खूप रोमांचक होता. दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही संघ अपयशी ठरला नाही. १४ व्या मिनिटाला स्पेनला सामन्याचा पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, जो निधीने वाचवला. दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला स्पेनने आक्रमक खेळ सुरू केला.

नतालिया विलानोवाचा पहिला गोल

सारा कार्मोना रामोसने कुशलतेने वर्तुळाभोवती ड्रिबलिंग केले आणि आत एक पास दिला, ज्याला नतालिया विलानोव्हा (१६’) ने यशस्वीरित्या गोलमध्ये  रूपांतरित केले, ज्यामुळे संघाला १-० अशी आघाडी घेत आली. पुढच्या काही मिनिटांत भारताला काही संधी देखील मिळाल्या, परंतु त्यांना त्यांचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाहीत.

हेही वाचा :W,W,W…टीम इंडियामधून वगळल्यानंतर अष्टपैलू खेळाडूने केला कहर, मध्य प्रदेशविरुद्ध हॅटट्रिक घेऊन पुनरागमनाचा केला दावा

भारताने ४१ व्या मिनिटाला केला एकमेव गोल

३६ व्या मिनिटाला सोनमकडून भारतासाठी पास रूपांतरित करण्यात आला, परंतु स्पेनने यशस्वी व्हिडिओ रेफरल घेतला. रेफरीने बॅक स्टिक पाहुन  गोल रद्द करण्यात आला. तसेच ३६ व्या मिनिटाला एस्थर कॅनालेसने स्पेनसाठी पेनल्टी कॉर्नर रूपांतरित केल्याने या गोलमुळे स्पेनची आघाडी २-० झाली आणि सामन्यावरील त्यांची अधिक मजबूत झाली. ४१ व्या मिनिटाला भारताने लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले. कनिका सिवाच (४१’) ने भारताचा पहिला गोल डागला आणि स्पॅनिश गोलकीपरला तिच्या स्ट्राइकने तो यशस्वी होऊ दिला नाही.

शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने आपल्या खेळाचा वेग वाढवला आणि गोल करण्याच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटपर्यंत त्यांना स्पेनच्या धावसंख्येची बरोबरी साधता आली नाही.  स्पेनने सामना २-१ असा आपल्या खिशात टाकला. परिणामी भारतीय महिला संघ ज्युनियर महिला हॉकी विश्वचषकाच्या बाहेर पडला.

Web Title: Womens junior hockey world cup indian team had to settle for 10th place after defeat to spain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 02:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.