The sports world was shocked! 16-year-old Abhimanyu Mishra created history! World champion Gukesh defeated in FIDE Grand Swiss..
Abhimanyu Mishra vs D Gukesh : क्रीडा जगताला हदारवून सोडणारी घटना घडली आहे. १६ वर्षीय अमेरिकन ग्रँडमास्टर अभिमन्यू मिश्राने २०२५ च्या फिडे ग्रँड स्विसमध्ये पाचव्या फेरीत विश्वविजेता डी गुकेशला पराभूत केले आहे. या विजयासह अभिमन्यू मिश्राने इतिहास रचला आहे. ६१ चालींच्या या शास्त्रीय सामन्यामध्ये विजय मिळवून अभिमन्यू मिश्राने मोठी कामगिरी करून दाखवली आहे. विद्यमान विश्वविजेत्याला पराभूत करणारा मिश्रा हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. ३० वर्षांपूर्वीचा विक्रम आता अभिमन्यूने मोडीत काढला आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : भारताने जिंकला TOSS, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; कशी असणार UAE ची फलंदाजी?
अभिमन्यू मिश्राचा जन्म ५ फेब्रुवारी २००९ रोजी न्यू जर्सी येथे झाला. मिश्रा २०२१ मध्ये सर्वात तरुण ग्रँडमास्टर (१२ वर्षे, ४ महिने आणि २५ दिवस) बनून पहिल्यांदाच चमकला होता. अभिमन्यू मिश्राच्या वडिलांकडून त्याला अडीच वर्षांचा असताना बुद्धिबळासोबत ओळख करून देण्यात आली होती. ८ सप्टेंबर २०२५ रोजी समरकंद येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात अभिमन्यू मिश्राने एका स्ट्रॅटेजिक मास्टरक्लासमध्ये गुकेशचा दणदणीत पराभव केला आहे. या मिश्राच्या विजयासह बुद्धिबळ जगतात खळबळ माजली आहे. त्याने १९९० च्या दशकापासून आजतागायत अबाधित असणारा विक्रम मोडीत काढला आहे.
गुकेशविरुद्धच्या विजयाव्यतिरिक्त, अभिमन्यू मिश्राने अव्वल मानांकित भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदला काळ्या तुकड्यांसह बरोबरीत रोखून सर्वांना धक्का दिला आहे. पाचव्या फेरीमध्ये प्रज्ञानंदचा मॅथियास ब्लूबॉमकडून झालेला पराभव हा भारताच्या आशांना देखील दुहेरी धक्काच होता. त्याच्या विजयावर प्रतिक्रिया देताना अभिमन्यू मिश्रा म्हणाला की तो त्याच्या समोरील मोठ्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कधीही स्वतःला लेखत नसल्याचे म्हटले आहे. तसेच तो म्हणाला की जर तो या फॉर्ममध्ये खेळत राहिला तर त्याला स्पर्धा जिंकण्याची संधी अधिक मिळते.
हेही वाचा : ICC T20 rankings मध्ये रवी बिश्नोईसह अर्शदीप सिंगचा जलवा! टॉप-१० मध्ये तीन भारतीय खेळाडूंनी पटकावले स्थान
अभिमन्यू मिश्राची कारकीर्द अनेक विक्रमांनी भरलेली राहिली आहे. मिश्रा हा आता सर्वात तरुण ग्रँडमास्टर होण्याव्यतिरिक्त, त्याने पहिल्या सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टरसह इतर अनेक विक्रम देखील आपल्या नावावर जमा केले आहेत. त्याने सध्या २६१० पेक्षा जास्त रेटिंगसह FIDE जागतिक टॉप १०० रँकिंगमध्ये देखील धडक मारली आहे. त्याने यापूर्वी ग्रँड स्विसमध्ये २७००-रेटेड ग्रँडमास्टर यू यांगीला पराभूत करण्याचा कारनामा केला होता. समरकंद येथे होणाऱ्या ग्रँड स्विस स्पर्धेत $६२५,००० ची मोठी बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. ही स्पर्धा २०२६ च्या उमेदवार स्पर्धेसाठी पात्रता म्हणून देखील काम करणार आहे.