
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
WPL 2026 – UP Warriors vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स महिला प्रिमीयर लीगचा 10 वा सामना पार पडला. या सामन्यामध्ये यूपी वॉरियर्सच्या संघाने विजयाचे खाते उघडले आहे. हा सामना यूपी वॉरियर्सच्या संघाने हरलीन देओलच्या जोरावर जिंकला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यामध्ये हरलीन देओलला रिटायर आऊट करण्यात आले होते. या सामन्यामध्ये हरलीन देओलने संपूर्ण कसर पुर्ण केली. महिला प्रीमियर लीग २०२६ चा सामना १५ जानेवारी रोजी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात झाला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत १६१ धावा केल्या. नॅट सायव्हर-ब्रंट वगळता मुंबईच्या इतर कोणत्याही फलंदाजाने लक्षणीय कामगिरी केली नाही. दोन्ही संघांनी हंगामातील त्यांचा चौथा सामना खेळला. हरलीन देओलच्या नाबाद अर्धशतकामुळे उत्तर प्रदेशने हंगामातील पहिला विजय मिळवला. यूपीने मुंबईचा ७ विकेट्सने पराभव केला, ज्यामुळे हंगामातील त्यांचा दुसरा पराभव झाला.
🚨 FIRST WIN FOR UP WARRIORZ IN WPL 2026 🚨 – It’s fitting that Harleen Deol is the star, one of the best kncoks in WPL history, A statement by her in just 24 hours. pic.twitter.com/X4ZAogRxlF — Johns. (@CricCrazyJohns) January 15, 2026
मुंबईची सलामीची फलंदाज गुणलन कमलिनी हिने संघाला चांगली सुरुवात दिली नाही. ती १२ चेंडूत ५ धावा करून बाद झाली, तर अमनजोतने ३३ चेंडूत ३८ धावा केल्या. नॅट सायव्हर-ब्रंटनेही ४३ चेंडूत ६५ धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने ११ चेंडूत १६ धावा केल्या, तर निकोला कॅरीने अखेर २० चेंडूत ३२ धावा केल्या, ज्यामुळे मुंबईला २० षटकांत ५ बाद १६१ धावा करता आल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशलाही चांगली सुरुवात करता आली नाही. मेग लॅनिंग २६ चेंडूत २५ आणि किरण नवगिरे १२ चेंडूत १० धावा करून बाद झाल्या. तथापि, फोबी लिचफिल्ड आणि हरलीन देओल यांनी जबाबदारी स्वीकारली आणि संघासाठी हुशारीने फलंदाजी केली. हरलीन देओलने ३९ चेंडूत ६४ धावांची शानदार नाबाद खेळी केली. लिचफिल्डनेही २२ चेंडूत २५ धावा केल्या. उत्तर प्रदेशने फक्त १८.१ षटकात १६२/३ धावा करून सामना जिंकला.