मुंबई इंडियन्सच्या UP वॉरियर्सविरुद्ध 162 धावांचे लक्ष्य (फोटो-सोशल मिडिया)
MIW vs UPW WPL 2026 Live Score : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथे डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सने नॅट सायव्हर-ब्रंटच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर ५ गडी गमावून १६१ धावा केल्या आहेत. या हंगामात पहिला विजय मिळवायचा असेल तर यूपी वॉरियर्स संघाला १६२ धावा कराव्या लागणार आहे. यूपी वॉरियर्सकडून फी एक्लेस्टोनने किफायतशीर गोलंदाजी करत १ विकेट घेतली.
यूपी वॉरियर्स संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि मुंबई संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात मुंबईची सुरुवात चांगली राहिली होती. अमनजोत कौर आणि गुणालन कमलिनी या सलामी जोडीने पहिल्या विकेट्ससाठी ४३ धावांची भागीदारी केली. अमनजोत कौर ३३ चेंडूत ३८ धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत ७ शौकर मारले. तिला दीप्ती शर्माने बाद केले. त्यानंतर गुणालन कमलिनी ५ धावा करून बाद झाली.
त्यानंतर नॅट सायव्हर-ब्रंटने डावाची सूत्रे हातात घेतली तिने कर्णधार हरमनप्रीत कौर आणि निकोला केरीसोबत महत्वाच्या भागीदारी करत संकटात सापडलेल्या मुंबई संघाला चांगल्या स्थितित पोहचवले. कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यात काही खास करू शकली नाही, ती १६ धावा करून आशा शोभणाची शिकार ठरली. सजीवन सजना १ धावा करून बाद झाली. तर नॅट सायव्हर-ब्रंट ४३ चेंडूत ६५ धावा करून नाबाद राहिली. तिने या खेळीत ९ चौकार आणि १ षटकार लगावला. तसेच निकोला केरी ३२ धावा करून नाबाद राहिली. यूपीकडून दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना जॉय आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
🔟th #TATAWPL fifty for the ever-dependable Nat Sciver-Brunt 🫡#MI eyeing a strong finish with the bat 💥 Updates ▶️ https://t.co/UPFLXNFhTQ #KhelEmotionKa | #MIvUPW pic.twitter.com/C47tL17IY6 — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 15, 2026
हेही वाचा : IND vs NZ T20I Series : मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका! ‘हा’ विजयवीर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर
मुंबई इंडियन्स महिला प्लेइंग इलेव्हन: गुणालन कमलिनी (डब्ल्यू), अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर (क), निकोला केरी, सजीवन सजना, संस्कृती गुप्ता, पूनम खेमनार, शबनीम इस्माईल, त्रिवेणी वशिष्ठ
यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन: किरण नवगिरे, मेग लॅनिंग (क), फोबी लिचफील्ड, हरलीन देओल, श्वेता सेहरावत (डब्ल्यू), क्लो ट्रायॉन, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना जॉय, शिखा पांडे, क्रांती गौड






