
फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा समारोप सोहळा रविवारी मध्यरात्री उशिरा स्टेड डी फ्रान्स येथे पार पडला. या काळात मनु भाकर आणि गोलरक्षक पीआर श्रीजेश हे भारतीय ध्वजवाहक होते. यापूर्वी नीरज चोप्रा हा भारतीय ध्वजवाहक होता. नीरज चोप्राने ऑलिम्पिक २०२४ मध्ये सिल्वर मेडल मिळवून दमदार कामगिरी करून दाखवली. त्याचबरोबर मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. त्यांनी केलेल्या कामगिरीचे जगभरामध्ये कौतुक केले जात आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांनी नीरज चोप्रा यांच्याशी चर्चा केली आणि पीआर श्रीजेश यांची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली. भारताचा दिग्गज गोलकिपर पीआर श्रीजेशने ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा पदक मिळवून हॉकी अलविदा केला आहे. अशा स्थितीत आयओएला त्याचा सन्मान करायचा होता.
आता X ने नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांना विशेष सन्मान दिला आहे. या दोघांच्या X-प्रोफाइलवर त्यांच्या नावासमोर आयफेल टॉवरचे स्टिकर लावण्यात आले आहे. आयफेल टॉवर पॅरिसमध्ये आहे, जेथे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. पॅरिस ऑलिम्पिकच्या पदकांमध्ये आयफेल टॉवरमधील लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण ६ पदके जिंकली. यामध्ये मनू भाकरने २ कांस्यपदक जिंकले, तर नीरज चोप्राने एक रौप्य पदक जिंकले.
ओलंपिक खेलों में भारत के लिए एक और पदक जीतके बहुत अच्छा लगा। इस बार पेरिस में हमारा National Anthem नहीं बज पाया, लेकिन आगे की मेहनत उसी पल के लिए होगी।💪 Very proud to be on the podium for India once again at the Olympic Games. Thank you for the love and support. Jai Hind! 🇮🇳… pic.twitter.com/b2DoatANPn — Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 10, 2024
Extremely humbled by the support and wishes that have been pouring in. This is something that I’ve always dreamt of. Proud to perform at the biggest stage for my country 🇮🇳 ❤️ pic.twitter.com/8U6sHOLulR — Manu Bhaker🇮🇳 (@realmanubhaker) July 30, 2024