Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranji Trophy 2025 : यश राठोडचा रणजी ट्रॉफीमध्ये धुमाकूळ! रचला एक अनोखा विक्रम; हजारे आणि कांबळी यांना टाकले मागे…

रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत, विदर्भाच्या यश राठोडने तामिळनाडूविरुद्ध शानदार शतक ठोकले. ही कामगिरी करून त्याने भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये एक नवीनच विक्रम प्रस्थापित केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 06, 2025 | 02:36 PM
Ranji Trophy 2025: Yash Rathod's sensational performance in Ranji Trophy! Created a unique record; Left Hazare and Kambli behind...

Ranji Trophy 2025: Yash Rathod's sensational performance in Ranji Trophy! Created a unique record; Left Hazare and Kambli behind...

Follow Us
Close
Follow Us:

Yash Rathore’s performance in Ranji Trophy : २०२५-२६ रणजी करंडक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत, विदर्भाच्या यश राठोडने तामिळनाडूविरुद्ध शानदार शतक झालकवले असून भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये एक नवीनच विक्रम प्रस्थापित केला आहे. राठोडने तामिळनाडूविरुद्ध १३३ धावांची शानदार खेळी साकारली, या खेळीने केवळ संघालाच तारळे नाही तर त्याच्या कारकिर्दीची आकडेवारी देखील  वाढवली आहे.

हेही वाचा : या मुलींमुळे झाले माझे पांढरे केस…अमोल मजुमदार यांनी सांगितली मजेशीर कहाणी, मोदींनाही हसू आवरले नाही; Video Viral

या हंगामात आतापर्यंत त्याने दुलीप करंडक, इराणी आणि रणजी करंडक यासह सात सामन्यांमध्ये ११०.७ च्या मोठ्या सरासरीने ७७५ धावा फटकावल्या आहेत. सोमवारी त्याने साकारलेल्या खेळीमुळे राठोड भारतीय क्रिकेटमधील काही मोठ्या नावांपेक्षा पुढे गेला आहे. त्याच्याकडे आता ६० च्या सरासरीने २,२८० धावा जमा आहेत.  ज्या भारतीय फलंदाजांमध्ये किमान २००० धावांसह सहाव्या क्रमांकाच्या प्रथम श्रेणी सरासरीच्या यादीत समाविष्ट आहे.

कांबळी आणि विजय हजारे यांना टाकले मागे..

राठोडने या खेळीसह भारताचे महान फलंदाज विजय हजारे (५८.३८) आणि विनोद कांबळी (५९.६७) यांना देखील पिछाडीवर सोडले आहे. तो आता ६० किंवा त्याहून अधिक सरासरीने किमान २००० प्रथम श्रेणी धावा करणाऱ्या फक्त १२ खेळाडूंपैकी एक असून द्विशतक न करता अशी कामगिरी करणारा  तो एकमेव खेळाडू आहे.

मागील वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये राठोड सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता, त्याने १० सामन्यांमध्ये ९६० धावा केल्या होत्या. यावेळी देखील त्याची बॅट त्याच ताकदीने धावा काढत आहे.  भविष्यात भारतीय क्रिकेटमध्ये एक अत्यंत विश्वासार्ह कसोटी फलंदाज असू शकतो याची चिन्हे आता दिसू लागले आहेत.

मला या वर्षी द्विशतक करायचे : यश राठोड

विजय हजारे आणि विनोद कांबळी यांच्या सरासरीला मागे टाकल्यानंतर, यश राठोडने चर्चेदरम्यान या वर्षासाठीच्या त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले असून तो म्हणाला की, “मला या वर्षी द्विशतक साजरे करायचे आहे आणि व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये देखील सुधारणा करायची आहे.” तसेच तो लांब डाव खेळण्यांबद्दल म्हणाला की, “मी यासाठी एनसीएची भूमिका महत्त्वाची मानतो. ते आम्हाला सर्व प्रकारच्या खेळपट्ट्या पुरवत असतात.”

हेही वाचा : IND vs AUS T20 : मिचेल मार्शने नाणेफेक जिंकले पहिले करणार गोलंदाजी, वाचा दोन्ही संघाची Playing 11

हजारे आणि कांबळी यांना मागे टाकण्याबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला की, “ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असून मी माझ्या मोठ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करत आहे. माझ्या मागे कठोर परिश्रम करणाऱ्या सर्वांचे मी आभारी  मानतो. मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करत राहू इच्छितो आणि लवकरच स्वतःला देशासाठी खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.”

Web Title: Yash rathore sets a record in ranji trophy surpassing hazare and kambli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • Ranji Trophy 2025
  • Vijay Hazare Trophy

संबंधित बातम्या

Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीसाठी विदर्भाचा संघ घोषित! हर्ष दुबे करणार 17 सदस्यीय संघाचे नेतृत्व 
1

Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीसाठी विदर्भाचा संघ घोषित! हर्ष दुबे करणार 17 सदस्यीय संघाचे नेतृत्व 

‘किंग’ कोहली खेळणार देशातंर्गत सामने! रिषभ पंत सांभाळणार संघाची कमान, दिल्लीने केली Vijay Hazare Trophy 2025–26 साठी संघाची घोषणा
2

‘किंग’ कोहली खेळणार देशातंर्गत सामने! रिषभ पंत सांभाळणार संघाची कमान, दिल्लीने केली Vijay Hazare Trophy 2025–26 साठी संघाची घोषणा

हिटमॅन खेळणार या तारखेला Vijay Hazare Trophy 2025–26 चा सामना! झाली संघाची घोषणा, वाचा संपूर्ण माहिती
3

हिटमॅन खेळणार या तारखेला Vijay Hazare Trophy 2025–26 चा सामना! झाली संघाची घोषणा, वाचा संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.