मध्य प्रदेशविरुद्धच्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात बरगडीला दुखापत झाल्याने युवा भारतीय फलंदाज साई सुदर्शन एक महिन्याहून अधिक काळ मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. सुदर्शन भारताच्या व्हाईट-बॉल संघाचा भाग नाही.
आता भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल देखील विजय हजारे ट्राॅफी स्पर्धेमध्ये सामील होणार आहे. शनिवारी जयपूरमधील जयपुरिया कॉलेज मैदानावर पंजाब विरुद्ध सिक्कीम संघाचा सामना गिल खेळणार आहे.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत रिंकू सिंग आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करत आहे. रिंकू सिंग विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या ३८ संघांच्या कर्णधारांमध्ये त्याने बाजी मारली आहे.
बुमराह विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत नाही आणि सध्या तो विश्रांती घेत आहे. बुमराहने तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील विजय हजारे ट्रॉफी सामना झाला त्या मैदानावर त्याने सराव केला त्याचे व्हिडिओ आणि…
आयपीएल २०२६ च्या लिलावात CSK ने विकत घेतलेल्या अमन खानने विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडविरुद्ध १० षटकांत १२३ धावा दिल्या. लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासात डावात कोणत्याही गोलंदाजाने ही कामगिरी केली नाही.
भारतीय विकेटकीपर-फलंदाज ध्रुव जुरेलने आपले पहिले लिस्ट ए शतक झळकावले आहे. उत्तर प्रदेशचा विकेटकीपर-फलंदाज ध्रुव जुरेलने १०१ चेंडूत नाबाद १६० धावा करत फलंदाजीने धुमाकूळ घातला.
२४ आणि २६ डिसेंबर रोजी बेंगळुरूमध्ये दिल्लीसाठी विजय हजारे ट्रॉफीचे पहिले दोन सामने खेळणारा कोहली ६ जानेवारी रोजी अलूर येथील केएससीए मैदानावर रेल्वेविरुद्धच्या साखळी सामन्यासाठी परतेल.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट दिल्लीकडून आणि रोहित मुंबईकडून खेळत आहे. दोघेही बीसीसीआयचे करारबद्ध खेळाडू आहेत, परंतु विजय हजारे ट्रॉफीमधून त्यांना भरपूर कमाई देखील होते.
Mumbai vs Uttarakhand: मुंबई आणि उत्तराखंड यांच्यातील सामना खेळवला जात आहे. या सामन्यात मुंबईचा स्टार खेळाडू आणि यष्टीरक्षक-फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याला क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये जवळपास १५ वर्षांनी पुनरागमन करणारा टीम इंडियाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने या स्पर्धेत शानदार पुनरागमन केले आहे. स्पर्धेतील त्याचा दुसरा सामना खेळताना, कोहलीने फक्त २९ चेंडूत अर्धशतक…
लाखो चाहत्यांच्या आशा यावेळी पूर्ण झाल्या नाहीत, कारण "हिटमॅन" कामगिरी करण्यात अपयशी ठरला. उत्तराखंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात, रोहित "गोल्डन डक" वर बाद झाला, म्हणजेच तो खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर बाद…
बिहारच्या विक्रमी धावसंख्येनंतर, क्रिकेट चाहत्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल की विजय हजारे ट्रॉफीमधील टॉप पाच सर्वोच्च सांघिक धावसंख्या कोणती आहे. विजय हजारे ट्रॉफीमधील टॉप-५ संघांच्या धावसंख्येवर एक नजर टाकूया.
स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या दिल्लीचा सामना गुजरातशी होईल. हा सामना बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळला जाईल. तर रोहित शर्माचा सवाई मानसिंग स्टेडियमवर उत्तराखंडशी सामना होईल.
बुधवारी विजय हजारे ट्रॉफीचा सामना झाला या सामन्यामधील एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बुधवारी विजय हजारे ट्रॉफी सामन्यात रोहित शर्मा सहभागी झाला.
केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य आहे. दोन्ही वरिष्ठ स्टार खेळाडू विराट - रोहित हे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, २४ डिसेंबर २०२५ रोजी आपापल्या देशांतर्गत संघांसाठी मैदानात उतरले.
ओडिशाचा फलंदाज स्वस्तिक सामलने विक्रमी विक्रमात आपले नाव कोरले आहे. बुधवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रविरुद्ध स्वस्तिक सामलने द्विशतक झळकावले. त्याने १६९ चेंडूत २१२ धावा केल्या.
विजय हजारे ट्रॉफीच्या हंगामातील पहिल्या दिवशी अलूरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात ओडिशाच्या स्वस्तिक सामलने १६९ चेंडूत २१२धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २१ चौकार आणि ८ षटकार मारले.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीने अरुणाचल प्रदेशविरुद्ध फक्त ८४ चेंडूत १९०धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज म्हणून मान देखील पटकावला…
दिल्लीकडून खेळताना विराट कोहलीने ८३ चेंडूत शतक झळकवले आहे. प्रथम फलंदाजी करताना आंध्रने २९९ धावांचे लक्ष्य दिले होते. २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने शानदार १३१ धावांची खेळी केली.
विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात भारताचा स्टार खेळाडू रोहित शर्माने मुंबईकडून खेळताना सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात ६१ चेंडूत शतक झळकावले आहे. रोहित शर्माने ९४ चेंडूत १५५ धावांची खेळी केली.