Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZIM VS SL : झिम्बाब्वेला मोठा झटका! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी संघाचा कर्णधार बाहेर

झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका आजपासून खेळवण्यात येत आहे. या पहिल्या सामन्यापूर्वीच झिम्बाब्वे संघाचा कर्णधार क्रेग एर्विन दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 29, 2025 | 04:31 PM
ZIM VS SL: Big blow to Zimbabwe! Team captain out before series against Sri Lanka

ZIM VS SL: Big blow to Zimbabwe! Team captain out before series against Sri Lanka

Follow Us
Close
Follow Us:

ZIM VS SL : झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे.  या मालिकेला आज २९ ऑगस्टपासून सुरूवात  होत  याहे. परंतु, अशातच सामना सुरू होण्यापूर्वीच झिम्बाब्वेला मोठा झटका बसला आहे. झिम्बाब्वे संघाचा कर्णधार क्रेग एर्विन दुखापतीमुळे या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. या मालिकेत एर्विनच्या जागी आता शॉन विल्यम्सला कर्णधार बनवण्यात आले आहे.

क्रेग एर्विन पायाच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. गुरुवारी करण्यात आलेल्या  एमआरआय अहवालात एर्विनच्या  पायाच्या  दुखापतीबद्दल माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे. झिम्बाब्वे संघासाठी क्रेग एर्विनला वगळणे हा मोठा धक्का मानला जात आहे.  तो  केवळ चांगला कर्णधारच नाही तर तो एक चांगला फलंदाज देखील आहे, त्याच्या जाण्याने संघाची बळकटी कमी झाली आहे.

हेही वाचा : BCCI मध्ये मोठा संघटनात्मक बदल! नव्या कार्यकारी अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची नियुक्ती

४० वर्षीय एर्विनने आतापर्यंत १२८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ३६०० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने  ४ शतके आणि २३ अर्धशतके झळकावली  आहेत. एर्विनच्या जागी ब्रेंडन टेलरला संघात स्थान देण्यात आले आहे.  चार वर्षांनंतर टेलर संघात पुनरागमन करणार आहे. त्याने २०२१ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

ब्रेंडन टेलरवर आयसीसीची  बंदी होती

मॅच फिक्सिंगशी संपर्क आल्याची सूचना न दिल्याबद्दल  जानेवारी २०२२ मध्ये ब्रेंडन टेलरवर आयसीसीकडून बंदी घालण्यात आली होती. टेलर साडेतीन वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा संघात पुनरागमन करत आहे. यापूर्वी टेलरने कसोटी सामन्यांमध्ये पुनरागमन केले होते. ३९ वर्षीय ब्रेंडन टेलरची एकदिवसीय कारकीर्द शानदार राहिली आहे. त्याने २०५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ शतके आणि ३९ अर्धशतकांसह ६६८४ धावा फटकावल्या आहेत.

हेही वाचा : २१ वर्षीय फलंदाजाचा दुलीप ट्रॉफीमध्ये धुमाकूळ! दानिश मालेवारचे नॉर्थ ईस्टविरुद्ध द्विशतकी तडाखा

एकदिवसीय मालिकेनंतर टी-२० मालिका होणार

झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवल्यानंतर या दोन संघामध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका देखील खेळवण्यात येणार आहे.  ७ ते ८ सप्टेंबर दरम्यान टी २० मालिकेतील तीन सामने खेळले जाणार आहे.  त्यानंतर श्रीलंकेचा संघ आशिया कप २०२५ साठी दुबईला रवाना होणार आहे. ९ सप्टेंबरपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होत  आहे.

झिम्बाब्वे वनडे संघ खालीप्रमाणे

बेन कुरन, ब्रायन बेनेट, ब्रेंडन टेलर, सिकंदर रझा, शॉन विल्यम्स (कर्णधार), क्लाइव्ह मधेवेरे, वेस्ली मधेवेरे, ब्रॅड इव्हान्स, टोनी मुन्योंगा, जोनाथन कॅम्पबेल, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, ट्रेव्हर ग्वांडू, न्यूमन न्यामुरी, एरन न्यामुरी.

Web Title: Zim vs sl zimbabwe captain craig erwin ruled out of series due to injury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 04:31 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.