राजीव शुक्ला(फोटो-सोशल मीडिया)
BCCI executive president : भारतीय क्रिकेट नियामक मंडळात मोठा संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयच्या नव्या कार्यकारी अध्यक्षपदी राजीव शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. रॉजर बिन्नी यांच्या जागी आता राजीव शुक्ला ही जबाबदारी सांभाळणार आहेत.
बीसीसीआयच्या घटनेत असलेल्या तरतुदींनुसार हा बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. बीसीसीआयने आखून दिलेल्या नियमांनुसार, मंडळाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यासाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे इतकी आहे.
हेही वाचा : IPL मध्ये सर्वाधिक षटके टाकणारे गोलंदाज कोणते? नजर टाका टाॅप 5 गोलंदाजावर
रॉजर बिन्नी यांनी वयाची ७० वर्षे पार केली आहेत. ज्यामुळे त्यांना त्यांच्या पदमुक्त व्हावे लागले आहे. असे देखील सांगण्यात येत आहे की, ही नियुक्ती सध्या वैध मानली जात आहे, कारण नवीन क्रीडा कायदा केंद्र सरकारकडून अद्याप अधिसूचित करण्यात आलेला नाही. यामुळे, बीसीसीआयला त्यांच्या विद्यमान नियमांनुसार निर्णय घेण्याचा अधिकार अबाधित आहे.
या दरम्यान झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर देखील चर्चा करण्यात आली आहे. बैठकीच्या अजेंड्यात ड्रीम-११ च्या जागी नवीन प्रायोजक शोधण्याबाबत देखील चर्चा यामध्ये सामील होती. या बदलाचा भारतीय क्रिकेटच्या प्रशासकीय आणि आर्थिक पैलूंवर देखील खोलवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमांनुसार, त्यांच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे इतकी ठरवण्यात आली आहे. या नियमानुसार, ७० वर्षे ४१ दिवसांचे विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना पद भूषविता येणार नाही.
हेही वाचा : Photos : KKR चा IPL 2026 च्या आखाड्यात नवा डाव! KL Rahul ला संघात घेण्यासाठी सुरू केल्या हालचाली..
रॉजर बिन्नी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यामुळे राजीव शुक्ला यांची बीसीसीआयचे पुढील कार्यवाहक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. २०२० पासून बीसीसीआयचे उपाध्यक्ष पदावर राहणारे ६५ वर्षीय राजीव शुक्ला पुढील अध्यक्षांच्या निवडीपर्यंत या पदावर राहणार आहेत. सौरव गांगुलीनंतर १८ ऑक्टोबर २०२२ रोजी रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआयचे ३६ वे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.