
फोटो सौजन्य- Poco Website
देशामध्ये 5G नेटवर्कचे सर्वच कंपन्यांकडून विस्तार केला जात आहे. या 5 जी नेटवर्कमुळे तंत्रज्ञानाचा वेग वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. ज्यावेळी देशात 2016 साली 4 जी आले त्यानंतर देशात झालेला बदल हा आपल्या समोर घडला आहे. डिजीटल इंडियासाठीच नव्हे तर प्रत्येकाकरिता आज 5 जी मोबाईल असेल तर त्याचा जास्त फायदा होणार आहे.
5 जी मोबाईलची किंमत थोडी जास्त असते मात्र Poco कडून या सणासुदीच्या काळात केवळ 8000 रुपयांमध्ये 5 G मोबाईल उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सामान्यत: 5 जी मोबाईलची किंमत ही 12 ते 15 हजारापासून सुरु होते मात्र POCO M6 हा फोन 7999 रुपयांना मिळत आहे. आणि जर तुम्ही मोबाईल एक्सेंज आणि बॅंक ऑफरसोबत घेतलात तर हा मोबाईल केवळ 4986 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही मोबाईल खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.
फ्लिपकार्टच्या सुरु असलेल्या बिग बिलियन डेज सेलमध्ये मोबाईल फोनवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहेत. Poco M6 खरेदी करताना जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाल 10 टक्यांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे केवळ 5000 हजारापेक्षाही कमी किंमतीमध्ये तुम्हाला Poco M6 खरेदी करता येणार आहे.
पोको एम 16 (POCO M6) वैशिष्ट्ये
POCO M6 स्मार्टफोन हा 3 प्रकार आणि रंग पर्यायांसह बाजारामध्ये उपलब्ध आहे. मोबाईलचा डिस्प्ले हा 6.79 इंचाचा FHD+ आहे. ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचवेळी मोबाईलमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास पोको एम6 मध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यासह मोबाईलमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, 3.5 मिमी हेडफोन जॅक व मायक्रोएसडी कार्ड स्लॉट उपलब्ध आहे.
11999 चा मोबाईल 4986 रुपयांमध्ये कसा मिळवायचा
POCO M6 5G स्मार्टफोनची किंमत ही 11,999 रुपये आहे मात्र फ्लिपकार्टवरील 33 टक्के डिस्काउंटसह 7,999 रुपयांच्या किंमतीमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही जुना मोबाईल फोन एक्सचेंज केलात तर तुम्हाला 2250 रुपये मिळू शकतात. त्याचबरोबर जर तुमच्याकडे फ्लिपकार्ट ॲक्सिस क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 763 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. ज्यामुळे तुम्हाला पोको एम 6 हा मोबाईल फक्त 4986 रुपयांमध्ये मिळणार आहे. हे लक्षात ठेवा की जुना मोबाईल एक्सचेंज करताना त्याची स्थिती तपासली जाईल आणि नंतर किंमत कळविली जाईल. ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 2250 रुपये मिळू शकतात.