फोटो सौजन्य - pinterest
नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारा Elon Musk आता एका मोठ्या यशामुळे चर्चेत आला आहे. Elon Musk च्या स्टार्टअप न्यूरोटेक्नॉलॉजी न्यूरालिंक कंपनीला मोठं यश मिळालं आहे. Elon Musk च्या न्यूरालिंक कंपनीने ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस डिवाइस दुसऱ्या रुग्णाच्या मेंदूत इम्प्लांट केलं आहे. न्यूरालिंक कंपनीचं हे इंप्लांटेशन पूर्णपणे यशस्वी झालं आहे. त्यामुळे जगभरात न्यूरालिंक कंपनीचं कौतुक केलं जात आहे. न्यूरालिंक कंपनीमुळे आता अर्धांगवायू असलेल्या रुग्णाचा मेंदू डिजिटल डिव्हाइस कंट्रोल करणार आहे.
हेदेखील वाचा- नवीन सिमकार्ड खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी सरकारचे अनिवार्य नियम वाचा
गेल्या अनेक महिन्यांपासून Elon Musk ची न्यूरालिंक कंपनी अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी एका खास मिशनवर काम करत आहे. या मिशनबाबत Elon Musk वेळोवेळी अपडेट देखील शेअर करतो. आता या मिशनबाबत एक नवीन अपडेट समोर आलं आहे. Elon Musk ने स्वत: एका पॉडकास्टमध्ये बोलताना या नवीन अपडेटची माहिती दिली आहे. हे पॉडकास्ट न्यूरालिंक कंपनीच्या नवीन यशावर आधारित होतं. कंपनीने हे ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस डिवाइस अशा प्रकारे डिझाइन केलं आहे की जे पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या रुग्णांना डिजिटल उपकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करेल. पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या रुग्णांना या ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस डिवाइसद्वारे केवळ विचाराने डिजिटल उपकरणे नियंत्रित करता येतील.
हेदेखील वाचा- अजूनही 2G नेटवर्कचा वापर करत आहात का? तर लगेच बंद करा अन्यथा होईल मोठं नुकसान
या यशाबाबत माहिती देताना Elon Musk ने सांगितलं की, न्यूरालिंक कंपनी अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी एका खास मिशनवर काम करत आहे. यापूर्वी ज्या रुग्णाच्या मेंदूमध्ये ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस डिवाइस इम्प्लांट करण्यात आलं होतं, त्या रुग्णाला वेगवेगळी कामे करण्यात मदत मिळत आहे. Noland Arbaugh असं या पहिल्या रुग्णाचं नाव आहे. Noland Arbaugh सध्या व्हिडिओ गेम खेळत आहे, इंटरनेट ब्राउझ करत आहे, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहे आणि लॅपटॉपवर कर्सर हलवत आहे. डिप्लेजिया नावाच्या आजाराने त्रस्त असूनही Noland Arbaugh ही सर्व काम करण्यास सक्षम आहे.
Elon Musk पुढे सांगितलं की, आता ज्या रुग्णाच्या मेंदूत ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस डिवाइस इम्प्लांट करण्यात आलं आहे, त्या दुसऱ्या रुग्णाला देखील Noland Arbaugh प्रमाणेच पाठीच्या कण्याला दुखापत आहे. त्याला अर्धांगवायूही झाला आहे. न्यूरालिंक कंपनीने ब्रेन-कंप्यूटर इंटरफेस डिवाइस दुसऱ्या रुग्णाच्या मेंदूत यशस्वीरित्या इम्प्लांट केलं आहे. दुसऱ्या रुग्णाच्या मेंदूतील इम्प्लांटचे 400 इलेक्ट्रोड योग्य प्रकारे काम करत आहेत. मेंदूला सिग्नल कॅप्चर करण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी डिझाइन केलेले न्यूरालिंकचे उपकरण एकूण 1,024 इलेक्ट्रोड्ससह सुसज्ज आहे.