फोटो सौजन्य - pinterest
सरकारने भारतातील सिमकार्ड खरेदी करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. कोणत्याही भारतीय नागरिकाला सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी सरकारच्या या नवीन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सरकारने भारतीय आणि परदेशी अशा दोन्ही नागरिकांसाठी सिमकार्ड खरेदी करण्याच्या नियमांत बदल केले आहेत. या नव्या नियमांनुसार आता भारतीय नागरिकांना सिम कार्ड खरेदी करण्यापूर्वी EKYC (Electronic Know Your Customer) करणे अनिवार्य असणार आहे. EKYC व्हेरिफिकेशन शिवाय आता भारतीय नागरिक सिमकार्ड खरेदी करू शकणार नाहीत.
हेदेखील वाचा- BSNL बाबत पंतप्रधान मोदींनी घेतला होता महत्वाचा निर्णय! दूरसंचार मंत्र्यांचा खुलासा
EKYC एक डिजिटल व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे. ज्यामध्ये युजर्सची ओळख आणि पत्ता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासला जातो. EKYC व्हेरिफिकेशन शिवाय आता भारतीय नागरिक सिमकार्ड खरेदी करू शकणार नाहीत. सरकारच्या या नव्या नियमांमुळे सायबर फसवणूक आणि घोटाळे यांसारखे प्रकार कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. यापूर्वी लोकं EKYC शिवाय कोणाच्याही नावाने सिमकार्ड खरेदी करू शकत होते. मात्र आता असे होणार नाही. तुम्हाला सिमकार्ड खरेदी करायचे असल्यास EKYC करणं बंधनकारक आहे.
हेदेखील वाचा- अँड्रॉईड – IOS WhatsApp युजर्ससाठी कंपनी घेऊन येतेय डबल धमाका! नवीन फीचर्स पाहून व्हाल हैराण
याशिवाय सरकारने सिमकार्ड खरेदीतील घोटाळे रोखण्यासाठी अनेक कठोर पावलं उचलली आहेत. आता भारतातील कोणत्याही नागरिकाला 9 पेक्षा जास्त सिमकार्ड खरेदी करता येणार नाही. कोणत्याही नागरिकाने या नियमाचे उल्लंघण केलं असल्याचे आढळल्यास 50 हजार ते 2 लाख रुपयां पर्यंतचा दंड भरावा लागणार आहे. तसेच चुकीच्या पध्दतीने सिमकार्ड खरेदी करणाऱ्या नागरिकांवर देखील आता कारवाई केली जाणार आहे. कोणीही चुकीच्या पध्दतीने सिमकार्ड खरेदी करत असल्याचे आढळल्यास त्याला 50 लाख रुपयांचा दंड आणि 3 वर्षांची कैद होऊ शकते. नागरिकांना फसवूणकीच्या वाढत्या घटनांपासून वाचवण्यासाठी सरकारने हे नवे नियम जारी केले आहेत. कोणीही या नियमांचे उल्लंघण करताना आढळल्यास त्या व्यक्तिला कठोर शिक्षा केली जाणार आहे.
सरकारच्या या नव्या नियमांचा परेदशी नागरिकांना मात्र फायदा होणार आहे. सरकारच्या या नव्या नियमांमुळे परदेशी नागरिकांना भारतात सिमकार्ड खरेदी करणं सोपं होणार आहे. यापूर्वी परदेशी नागरिकांना भारतात Airtel, Jio आणि Vi चे सिमकार्ड खरेदी करताना स्थानिक नंबरवरून ओटीपी आवश्यक होता, परंतु आता असे होणार नाही. सरकारच्या या नव्या नियमांमुळे परदेशी नागरिकांना भारतात सिमकार्ड खरेदी करणं अधिक सोप होणार आहे. नवीन नियमानुसार आता परदेशी नागरिकांना भारतात सिम खेरदी करताना त्यांच्या ईमेलवर ओटीपी मिळणार आहे. त्यामुळे परदेशी नागरिकांना सिमकार्ड खरेदी करण्यासाठी स्थानिक नंबरची गरज भासणार नाही. याचा अर्थ, आता परदेशी नगरिक भारतात Airtel, Jio आणि Vi चे सिमकार्ड खरेदी करताना त्यांच्या ईमेलव्दारे ओटीपी मिळवू शकतात.