आश्चर्यकारक! एयरपॉडसने शोधली चोरी झालेली करोडोंची फरारी, नेमकं प्रकरणं काय
भारतासह जगभरात कार चोरीच्या घटना घडत आहेत, परंतु एका व्यक्तीला त्याच्या एअरपॉड्सच्या मदतीने त्याची 5 कोटी रुपयांची फरारी कार सापडली आहे. ॲपलचे हे डिव्हाईस कार मालकासाठी खूप फायदेशीर ठरले आहे. अॅपल फाइंड माय वैशिष्ट्याच्या मदतीने, बऱ्याच लोकांना त्यांचे आयफोन, एअरपॉड्स आणि इतर गॅझेट सापडले असतील. एअरपॉड्सच्या मदतीने पहिल्यांदाच कार मालकाला त्याची 5 कोटी रुपयांची फरारी कार सापडली आहे. फरारी कारच्या मॉडेलबाबत माहिती मिळालेली नाही.
हेदेखील वाचा- तुमच्या फोनमधून ‘हे’ धोकादायक ॲप्स लगेच डिलीट करा, छोटीशी चूकही तुम्हाला अडचणीत आणू शकते
लंडनमधील ग्रीनविचमध्ये त्या व्यक्तीने आपली नवीन कार पार्क केली. यावेळी तो चुकून त्याचे अॅपल एअरपॉड्स त्याच्या कारमध्ये विसरला. ही चूक त्याच्यासाठी वरदान ठरली आणि त्याला त्याची चोरी झालेली कार सापडली. संबंधित व्यक्तिला एअरपॉड्सकडून सिग्नल मिळाले. यानंतर त्याने या प्रकरणाची माहिती तात्काळ पोलिसांना दिली आणि त्याची फरारी कार तात्काळ शोधण्यात आली. यानंतर त्यांनी AirPods आणि अॅपल कंपनीचे आभार मानले. (फोटो सौजन्य – pinterest)
अॅपलच्या AirPods मुळे एका व्यक्तिला 5 कोटी रुपयांची हरवलेली फरारी सापडली आहे. हे प्रकरण अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील आहे.आता एअरपॉड्सला करोडोंची हरवलेली कार कशी सापडली हे समजून घेण्यासाठी, सर्वात आधी अॅपलच्या “Find My” वैशिष्ट्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. हे एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य आहे जे अॅपल डिव्हाइस शोधण्यात खूप उपयुक्त आहे. हे इतके मजबूत वैशिष्ट्य आहे की तुमचा आयफोन बंद असला तरीही ते त्याचे लोकेशन शोधते. हे वैशिष्ट्य अॅपल ID किंवा iCloud ID सह कार्य करते.
हेदेखील वाचा- तुमच्या WhatsApp वर आत्ताच सेव्ह करा ‘हे’ 4 नंबर! तुमच्या अनेक समस्या चुटकीसरशी दूर होतील
या आयडीशी कनेक्ट केलेली सर्व डिव्हाईस, जसे की AirPods, AirTags, iPhone आणि iPad, त्यांचे शेवटचे लोकेशन आणि लाईव्ह लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकते. या वैशिष्ट्याच्या मदतीने अमेरिकन माणसाला त्याची हरवलेली फरारी सापडली आहे. वास्तविक, गृहस्थ त्यांचे एअरपॉड्स कारमध्येच विसरले होते. एका अहवालानुसार, त्या व्यक्तीने त्याचे नवीनतम 2023 मॉडेल एका ठिकाणी पार्क केले आणि तो परत येईपर्यंत चोर त्याच्या फरारीसह पळून गेला होता. गृहस्थ नाराज झाले पण काही वेळाने त्यांना आठवले की त्यांचे अॅपल एअरपॉड्स कारमध्येच राहिले होते. त्यांनी त्वरीत लाईव्ह लोकेशन शोधून याबाबत पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी याचा तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांना ही कार एका गॅस स्टेशनवर सापडली. मात्र, चोरट्याने पोलिसांना पाहताच तो पळून गेला. 25 हजार रुपयांच्या AirPods मुळे 5 कोटी रुपयांची कार शोधण्यात यश आलं आहे. ॲपल तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्याला त्यांची हरवलेली वस्तू सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याशिवाय ॲपलच्या अनेक उत्पादनांनी त्यांच्या यूजर्सचे प्राण वाचवण्यात मदत केली आहे.