तुमच्या फोनमधून 'हे' धोकादायक ॲप्स लगेच डिलीट करा, छोटीशी चूकही तुम्हाला अडचणीत आणू शकते
आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक ॲप्स आहेत. आपल्या प्रत्येक कामासाठी आपण प्ले स्टोअरवरून वेगवेगळे ॲप्स डाऊनलोड करतो. आपल काम झालं किंवा फोनचं स्टोरेज फुल झालं तर आपण काही ॲप्स डिलीट देखील करतो. पण आता तुम्हाला काही धोकादायक ॲप्स तुमच्या स्मार्टफोनमधून डिलीट करायचे आहेत. छोट्या-छोट्या कामांसाठी आपण Play Store वर जाऊन ॲप्स इन्स्टॉल करतो, परंतु काही वेळा आपल्याकडून चुका होतात, ज्यामुळे नंतर आपलं मोठ्या प्रमाणत नुकसान होते.
हेदेखील वाचा- ओटीपी अॅप्स सब्सक्रिप्शनच्या ऑटो पेमुळे हैराण झालात? स्मार्टफोनमधील ‘ही’ सेटिंग करेल मदत
प्ले स्टोअरवर लाखो ॲप्स उपलब्ध आहेत, त्यापैकी काही विश्वसनीय आहेत आणि काहींवर अजिबात विश्वास ठेवता येत नाही. काही लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उळण्यासाठी तयार केलेलं असतात. आता एका सायबर सुरक्षा कंपनीला असेच एक ॲप सापडले आहे जे लोकांची फसवणूक करत आहे. विशेषतः गुंतवणूकदार हे ॲप वापरत आहेत. वॉलेट कनेक्ट एअरड्रॉप वॉलेट असं या ॲपच्या नाव आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल प्ले स्टोअरवर एक ॲप सापडले आहे जे क्रिप्टोकरन्सी चोरण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. ह्या ॲपच्या बाबतीत असणारी धोकादायक गोष्ट म्हणजे प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यापूर्वी 5 महिन्यांहून अधिक काळ हे ॲप सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. ते मार्च 2024 मध्ये प्ले स्टोअरवर अपलोड करण्यात आले होते. मात्र आता हे ॲप हटवण्यात आलं असून सर्वांनी त्यांच्या फोनमधून देखील हे ॲप डिलीट करावं असं आवाहन सायबर सुरक्षा कंपनीने केलं आहे.
वॉलेट कनेक्ट एअरड्रॉप वॉलेट ॲपच्या वापरही अनेकजण करत होते. ज्या ॲपबद्दल सायबर सुरक्षा कंपनीने इशारा दिला आहे ते वॉलेट कनेक्ट एअरड्रॉप वॉलेट ॲप आहे. हे अँड्रॉइड वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहे. या बनावट ॲपने गेल्या काही महिन्यांत अनेकांची फसवणूक करून गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केली आहे.
हेदेखील वाचा- Lava Agni 3 5G ची या दिवशी भारतात होणार एंट्री, टीझर जारी करत कंपनीने दिली माहिती
वॉलेट कनेक्ट एअरड्रॉप वॉलेट या बनावट ॲप बाबत सुरक्षा कंपनीने एक अहवाल जारी केला आहे. अहवालात म्हटलं आहे की, हॅकर्स 5 महिन्यांत गुंतवणूकदारांकडून सुमारे $70,000 (सुमारे 58.6 लाख रुपये) किमतीची क्रिप्टोकरन्सी चोरण्यात यशस्वी झाले. एवढेच नाही तर बनावट रिव्ह्यूमुळे ॲप डेव्हलपर्स लोकांचा विश्वास जिंकण्यातही यशस्वी ठरले. आणि त्याला 10 हजार डाउनलोड मिळाले. हॅकर्सनी वैध क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मची नक्कल करणाऱ्या फिशिंग वेबसाइट्स आणि ॲप्सचा वापर केला. त्यामुळे नवीन वापरकर्ते त्यांच्या जाळ्यात अडकले. त्यामुळे कोणतेही ॲप डाउनलोड करताना योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. मोबाइलवर अॅप्स डाऊनलोड करताना योग्य ती काळजी घ्यावी, गरजेचे व अधिकृतच अॅपच डाऊनलोड करावेत.