गुगल मॅपवर तुमच्या घरचा पत्ता अॅड करायचा, पण प्रोसेस माहित नाही! नो टेंशन, या स्टेप्स ठरतील तुमच्यासाठी फायदेशीर
Add Home Address At Google Map: जगभरात वापरलं जाणार आणि लोकप्रिय नेविगेशन अॅप गुगल मॅप सतत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवनवीन अपग्रेड घेऊन येत आहे. या नवीन अपग्रेडमुळे गुगलचा वापर युजर्ससाठी अधिक सोपा होत आहे. रात्रीच्या वेळी किंवा निर्जन ठिकाणी, पत्ता सांगायला कोणी नसतं, अशा वेळी तुमच्या सोबत आणि तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असतो गुगल मॅप. गुगल मॅप तुम्हाला प्रत्येक ठिकाणाची अचूक माहिती देतो. गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही कोणताही पत्ता अगदी सहज शोधू शकता. पण तुम्ही कधी गुगल मॅपवर तुमच्या घरचा पत्ता शोधला आहे का?
हेदेखील वाचा- गुगल मॅपही देतोय प्रभू रामांच्या अयोध्येतील प्रवासाची साक्ष, पुराणातील हा दावा ठरतोय खरा
गुगल मॅपचे करोडो युजर्स आहेत. अनेक लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणाची माहिती गुगल मॅपवर टाकतात. तुम्ही तुमच्या घराचा, दुकानाचा किंवा ऑफिसचा पत्ता देखील गुगल मॅपवर जोडू शकता. गुगल मॅप त्यांच्या युजर्सना अशी एक सुविधा देते ज्याच्या मदतीने युजर्स त्यांच्या घरचा पत्ता अॅपवर अॅड करू शकता. आणि हा अॅड केलेला पत्ता सर्च केल्यानंतर अगदी सहज शोधला देखील जाऊ शकतो. गुगल मॅपवर घराचा पत्ता जोडल्याने युजर्सना बराच फायदा होऊ शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप गुगल मॅपवर घराचा पत्ता ॲड केला नसेल, तर तुम्ही आत्ताच हे काम पूर्ण करा. तुम्ही हा पत्ता बदलू किंवा एडीट करू शकता. (फोटो सौन्य – pinterest)
हेदेखील वाचा- आता गुगल मॅप सांगाणार कोणता फ्लायओव्हर घ्यायचा! या 8 शहरांसाठी आलं फीचर