गुगल मॅपही देतोय प्रभू रामांच्या अयोध्येतील प्रवासाची साक्ष, पुराणातील हा दावा ठरतोय खरा
आपण लहानपणापासून दसऱ्याची एक गोष्ट ऐकत आहोत. प्रभू रामांनी जेव्हा रावणाचा वध केला तेव्हा ते सिता मातेला घेऊन अयोध्येच्या प्रवासाला निघाले. त्यांचा हा प्रवास 21 दिवसांचा होता. 21 दिवसांनंतर जेव्हा प्रभू राम आणि सिता माता अयोध्येत आले, त्या दिवशी दिवाळी साजरी करण्यात आली. प्रभू राम आणि सिता माता यांच्या लंकेपासूनच्या अयोध्येपर्यंतच्या प्रवासाची साक्ष आता गुगल मॅप देखील देत आहे. रावणाच्या लंकेपासून प्रभू रामांच्या अयोध्येपर्यंतचा कालावधी गुगल मॅपवर देखील 21 दिवसांचा दाखवण्यात आला आहे. गुगल मॅपवर हा प्रवास 507 तास म्हणजे 21 दिवस आणि 3 तासांचा असल्याचं सांगितलं जात आहे.
हेदेखील वाचा- आता गुगल मॅप सांगाणार कोणता फ्लायओव्हर घ्यायचा! या 8 शहरांसाठी आलं फीचर
श्रीरामांचे अस्तित्व सिद्ध करणारे अनेक पुरावे आहेत. श्रीरामायण काल्पनिक म्हणणाऱ्यांना आता गुगल मॅपनेही उत्तर दिले आहे. सीता मातेला रावणाच्या तावडीतून मुक्त केल्यानंतर श्रीरामांना लंकेतून अयोध्येला परतण्यासाठी 21 दिवसांचा कलावधी लागला होता, असे श्रीरामायणात वर्णन आहे. श्रीराम लंकेहून 21 दिवसांनी पायी चालत अयोध्येला पोहोचले, तेव्हा लोकांनी दिवे लावून त्यांचे भव्य स्वागत केले. या दिवशी अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात आली, असं देखील म्हटलं जात. लंकेतून अयोध्येला पोहोचण्यासाठी श्रीरामांना आणि सिता मातेला 21 दिवसांचा अवधी लागल्याचा उल्लेख पुराणात आहे. आता गुगल मॅप देखील श्रीलंकेतून पायी चालत अयोध्येला जाण्यासाठी लागणारा वेळ 21 दिवस दाखवत आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
Why is Diwali celebrated 21 days after Dussehra.
They told me that it took Shree Ram ji 21 days to walk from Srilanka to Ayodhya.
I then checked it in Google maps and I was just shocked to see it does take 21 days to get back.So Shree Ram ji did exist and he knew the… pic.twitter.com/d2uedGp2d6
— Mukul Dekhane (@dekhane_mukul) October 12, 2024
गुगल मॅपवर पाहिल्यास लंकेहून अयोध्येला जाण्यासाठी 21 दिवस लागतात. गुगल मॅपवर लंकेची राजधानी ते अयोध्येपर्यंतचे अंतर 3125.6 किलोमीटर दाखवते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 542 तास म्हणजेच 21 दिवस आणि 3 तासांचा कालावी लागू शकतो. याबाबत मुकुल देखणे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. दसऱ्यानंतर 21 दिवसांनी दिवाळी का साजरी केली जाते, या प्रश्नाचे उत्तर मुकुल देखणे यांनी गुगल मॅपच्या मदतीने देण्याचा प्रयत्न केला आहे.
हेदेखील वाचा- गुगल मॅपचे फ्युएल इकॉनॉमी फीचर तुम्हाला ट्रीपचे पैसे वाचवण्यासाठी करेल मदत, आताच करा ही सेटिंग
मुकुल देखणे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, दसऱ्यानंतर 21 दिवसांनी दिवाळी का साजरी केली जाते? सांगितलं जात की श्री राम यांना लंकेतून अयोध्येला परतण्यासाठी 21 दिवस लागले. मी गुगल मॅपवर तपासले तेव्हा मला आश्चर्य वाटले. कारण नकाशात लंकेहून अयोध्येला पायी जाण्यासाठी 21 दिवस लागतात असे दाखवले आहे. श्रीराम या पृथ्वीवर होते. एवढेच नाही तर श्रीराम यांना सर्वात वेगवान मार्ग माहित होता.
मुकुल देखणे यांच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, श्रीरामांनी त्यावेळेस घेतलेला मार्ग आणि आता गुगल मॅपने दाखवलेला मार्ग यात काही फरक आहे. तर काहींनी म्हटलं आहे की, श्रीराम लंकेहून पुष्पक विमानाने अयोध्येला परतले होते. पण काही लोकांनी गुगल मॅप आणि उपलब्ध कागदपत्रे आणि पुराव्यांनुसार चालण्याचा मार्ग योग्य असल्याचे म्हटले आहे.