पाकिस्तान टेक्नोलॉजीच्या नव्या शिखरावर! मुलांना शिकवायला शाळेत आले AI शिक्षक, व्हिडीओ व्हायरल
AI ने खूप प्रगती आहे. AI मुळे आपली अनेक कामं शक्य झाली आहेत. AI आपल्याला आपल्या प्रत्येक कामात मदत करत आहे. अनेक ठिकाणी तर AI च्या मदतीने रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील केल्या जात आहेत. तसेच हॉटेलमध्ये देखील AI कडून कामं करून घेतली जात आहेत. अशातच आता AI च्या बाबतीत पाकिस्तानने नवी प्रगती केली आहे. पाकिस्तानच्या शाळेत मुलांना शिकवण्यासाठी AI शिक्षक आले आहेत. AI शिक्षकांमुळे आता विद्यार्थ्यांना एक नवीन अनुभव मिळणार आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पाकिस्तानातील कराची शहरातील एका शाळेत मुलांना शिकण्यासाठी AI शिक्षक आले आहेत. शिक्षण आणि टेक्नोलॉजी अशा दोन्ही क्षेत्रांसाठी हा नवीन प्रयोग आहे. या नवीन अनुभवाने मुलांना अनेक नवीन गोष्टी शिकता येणार आहेत. AI शिक्षक मुलांना शाळेत शिकवत असल्याचा व्हिडीओ देखील पाकिस्तानातील युट्युब चॅनेलवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये AI शिक्षक पाकिस्तानाच्या कराची शाळेत मुलांना शिकवताना दिसत आहे. या AI शिक्षिकेला ‘मिस अनी’ असे नाव देण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
मिस अनी ही एक AI शिक्षक आहे. AI शिक्षक मिस अनी मुलांना कशा प्रकारे शिकवते आणि कशा प्रकारे मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देते, हे युट्युबवरील व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी AI शिक्षिका मिस अनीला पसंती दर्शवली आहे. व्हिडिओमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले आहे की मुले AI टीचरला खूप पसंत करत आहेत.
मुले मानवी शिक्षकाला फक्त त्यांच्या विषयाचे प्रश्न विचारत असत. पण मुलं AI टीचरला असंख्य प्रश्न विचारत आहेत. याशिवाय, मुलं AI च्या उत्तरांनी समाधानी देखील आहे. मुलांना AI शिक्षिकेसोबत शिकण्याचा अनुभव अत्यंत मजेदार वाटत आहे. ही कल्पना शाळेच्या उपमुख्याध्यापकांची होती, असं सांगितलं जात आहे. ही कल्पना तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुखांनी राबवली आहे. हे AI शिक्षक तयार करण्यासाठी सुमारे 7 ते 8 महिने लागले.
AI शिक्षक आधुनिक अल्गोरिदम आणि मशीन लर्निंग तंत्रांवर आधारित आहे. हे विद्यार्थ्यांच्या भूतकाळातील कामगिरी, स्वारस्य आणि अडचणींचे विश्लेषण करते आणि त्यांना वैयक्तिकरित्या शिकवते. शिवाय, हे शिक्षक ऑडियो-विजुअलचा वापर करून जटिल विषय विद्यार्थ्यांना सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने समजावून सांगण्यास सक्षम आहेत.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा