Airtel युजर्सची मजाच मजा! होळीच्या मुहूर्तावर कंपनीची धमाकेदार ऑफर, आता वाया जाणार नाही इंटरनेट डेटा; असा मिळणार एक्ट्रा फायदा
भातातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Airtel ने त्यांच्या युजर्ससाठी होळीच्या मुहूर्तावर एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा प्लॅन युजर्ससाठी अतिशय महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे. शिवाय या प्लॅनची किंमत देखील परवडणारी आहे. Airtel ने लाँच केलेल्या या प्लॅनची किंमत 60 रुपयांपेक्षा कमी आहे आणि या प्लॅनमध्ये मिळणार फायदे प्रचंड आहेत. Airtel ने लाँच केलेला हा नवीन रिचार्ज प्लॅन म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका.
टेलिकॉम कंपनी Airtel ने त्यांच्या युजर्ससाठी 59 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. होळीनिमित्त हा खास प्लॅन कंपनीने सुरु केला आहे. हा प्लॅन अशा युजर्ससाठी फायदेशीर आहे जे त्यांचा दैनंदिन डेटा वापरू शकत नाहीत. कारण अनेकदा असं होतं, की कमी किंमतीच्या रिचार्ज प्लॅनमध्ये आपल्याला प्रत्येक दिवसासाठी मिळणारा संपूर्ण डेटा आणि वापरला जात नाही आणि हा डेटा वाया जातो. कारण हा डेटा रोलओव्हर देखील केला जात नाही. मात्र आता कंपनी अशा युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नवीन रिचार्ज प्लॅनद्वारे, युजर्स सोमवार ते शुक्रवारच्या दिवसातील उर्वरित डेटा आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी वापरू शकतील. या प्लॅनसह, Airtel त्यांच्या ग्राहकांना डेटा रोलओव्हर सुविधा देणाऱ्या दूरसंचार कंपन्यांच्या यादीत सामील होईल.
Airtel मध्ये डेटा रोलओव्हर फीचरचा लाभ घेण्यासाठी युजर्सना केवळ 59 रुपयांचा प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. या प्लॅनसह, युजर्स सोमवार ते शुक्रवार या दिवसांतील उर्वरित डेटा शनिवार आणि रविवारी वापरू शकतील. याचा अर्थ असा की युजर्स संपूर्ण आठवड्याचा उर्वरित डेटा आठवड्याच्या शेवटी वापरू शकतील. युजर्स रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत डेटा वापरू शकतील. सोमवारपासून उर्वरित 12 तासांसाठी दैनिक डेटा सुरू होईल.
टेलिकॉम टॉकच्या वृत्तानुसार, हा डेटा रोलओव्हर प्लॅन फक्त त्या Airtel युजर्स साठी उपलब्ध आहे जे अमर्यादित व्हॉइस पॅकसह दैनिक डेटा बेनिफिट वापरत आहेत. Airtel ने त्यांच्या अमर्यादित योजनांमध्ये डेटा रोलओव्हर फीचर थेट जोडलेले नाही. त्याऐवजी, कंपनीने ते अॅड-ऑन पॅक म्हणून सादर केले आहे. म्हणजेच आता Airtel युजर्सना त्यांच्या उर्वरित डेटा लाभ घ्यायचा असेल तर एक वेगळा पॅक खरेदी करावा लागणार आहे.
Airtel चा हा प्लॅन सध्या फक्त हरियाणा आणि ईशान्य सर्कलमधील प्रीपेड युजर्ससाठी उपलब्ध आहे. अशी अपेक्षा आहे की कंपनी लवकरच इतर सर्कलसाठी हा प्लॅन सादर करू शकते. असे दिसते की कंपनी सध्या या योजनेची चाचणी घेत आहे. त्यामुळे ही योजना युजर्ससाठी कधीपासून सुरु होईल आणि युजर्स या नवीन प्लॅनचा कधीपासून लाभ घेऊ शकतील याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.