Asus Laptop Launched: Zenbook A14 आणि Vivobook 16 ची भारतात एंट्री, तब्बल इतकी आहे किंमत! जाणून घ्या फीचर्स
टेक कंपनी Asus चे दोन नवीन लॅपटॉप भारतात लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही नवीन लॅपटॉप Zenbook A14 आणि Vivobook 16 या नावाने भारतात लाँच करण्यात आले आहेत. Asus Zenbook A14 लॅपटॉप कंपनीने दोन प्रोसेसर व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहेत, ज्यामध्ये Snapdragon X Elite आणि Snapdragon X ऑप्शन यांचा समावेश आहे. तर Asus Vivobook 16 लॅपटॉप Snapdragon X X1-26-100 चिपसह लाँच करण्यात आला आहे.
कंपनीने सांगितलं आहे की, हे कंपनीचे Copilot+ लॅपटॉप आहेत, जे Qualcomm Hexagon NPU सह येतात. Zenbook A14 मध्ये 70Wh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. त्याच वेळी, Vivobook 16 मध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 50Wh बॅटरी आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. नवीन Zenbook A14 आणि Vivobook 16 लॅपटॉपची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Asus ZenBook A14 लॅपटॉपचा Snapdragon X व्हेरिअंट कंपनीने 99,990 रुपयांच्या किंमतीत भारतात लाँच केला आहे. तसेच, Snapdragon X Elite मॉडेल व्हेरिअंटची किंमत 1,29,990 रुपये आहे. दुसरा नवीन Vivobook 16 लॅपटॉप 65,990 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा लॅपटॉप Amazon आणि Asus eShop वरून खरेदी करता येईल.
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, Asus ZenBook A14 मध्ये 14-इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा नवीन लॅपटॉप Windows 11 Home सह येते. याशिवाय, ते Snapdragon X आणि Snapdragon X Elite प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 16GB RAM + 512GB स्टोरेज देण्यात आलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी यात full-HD Asus AI IR कॅमेरा देण्यात आला आहे. Snapdragon X Elite मॉडेल 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. Snapdragon X प्रोसेसर 65W चार्जिंग सपोर्ट सपोर्टसह येतो. दोन्ही मॉडेल्समध्ये 70Wh बॅटरी आहे.
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, Asus Vivobook 16 मध्ये 16-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय, या लॅपटॉपमध्ये Qualcomm Snapdragon X X1-26-100 प्रोसेसर आहे. हा नवीन लॅपटॉप 16GB RAM आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटसह लाँच करण्यात आला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी यात full-HD IR कॅमेरा देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये 50Wh बॅटरी आहे, ज्यामध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.