Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचा तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

रॅम आणि एसएसडीसारख्या संगणकातील अत्यावश्यक घटकांच्या किमतीत तब्बल ४०० टक्क्यांची वाढ झाल्याने संगणक बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे. या दरवाढीमुळे लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या किंमती वाढू लागल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 17, 2026 | 12:14 PM
महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचाही तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

महागाईचा डिजिटल फटका! सेमिकंडक्टरचाही तुटवडा; संगणकाचे स्पेअरपार्ट 400 टक्क्यांनी महागले

Follow Us
Follow Us:
  • रॅम आणि एसएसडी महागल्याने लॅपटॉप-डेस्कटॉपच्या किंमती ५ ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
  • विशेषतः ३०-५० हजारांच्या बजेटमधील मॉडेल्सवर याचा अधिक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
  • या दरवाढीमुळे ग्राहक आता स्वस्त पर्यायांकडे वळत आहेत.
संगणक आणि लॅपटॉपसाठी अत्यावश्यक असलेल्या रँम आणि एसएसडी या प्रमुख घटकांच्या किमतीत गेल्या काही महिन्यांत ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम देशभरातील संगणक बाजारपेठेवर झाला असून, परिणामी लॅपटॉप आणि डेस्कटॉप संगणकांचे दर वाढले आहेत. देशात डिजिटल शिक्षण, ऑनलाइन व्यवहार, आयटी सेवा तसेच औद्योगिक क्षेत्रात संगणकाचा वापर सातत्याने वाढत असताना, वाढलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्य ग्राहक, विद्यार्थी आणि लघुउद्योगांवर आर्थिक ताण वाढला आहे. व्यापारी सूत्रांच्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत लॅपटॉप व संगणकांच्या किमतींमध्ये सरासरी ५ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. विशेषतः ३० ते ५० हजार रुपयांच्या बजेटमधील लॅपटॉप, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त मॉडेल्स तसेच कार्यालयीन वापरासाठीचे संगणक या श्रेणीत दरवाढ अधिक जाणवत आहे.

India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

स्वस्त पर्यायांकडे कल

दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू यांसारख्या महानगरांसह मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर भारतातील ग्रामीण भागातही या दरवाढीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत असल्याचे संगणक तज्ज्ञ अशोक गुरनाळे यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगरसह, मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर येथील विक्रेत्यांच्या मते विद्यार्थ्यांची मागणी कायम असली तरी ग्राहक स्वस्त पर्यायांकडे वळत आहेत.

रॅम, एसएसडी आणि प्रगत प्रोसेसरला मागणी

तैवान, बीन, दक्षिण कोरिया व अमेरिका येथे होणा-या उत्पादनावर कोविडनंतरचे अडथळे, वाहतूक खर्चात वाढ व पुरवठा साखळीतील समस्या यांचा परिणाम झाला असून, त्यामुळे घटकांची उपलब्धता कमी होऊन दर वाढले आहेत. याशिवाय एआय व डेटा सेंटर्समुळे मागणी वाढली आहे. कृत्रिम बुद्धिमता (एआय), क्लाउड कंप्यूटिंग आणि डेटा सेंटर्सच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे उच्च क्षमतेची रॅम, वेगवान एसएसडी आणि प्रगत प्रोसेसरची मागणी वाढली आहे. यामुळे ग्राहक बाजारासाठी उपलब्ध घटक कमी पडत असून किमती वाढत आहेत.

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आयात खर्चही वाढला

सेमीकंडक्टर आणि चीप निर्मितीसाठी लागणान्या सिलिकॉन, तांबे, कोबाल्ट आदी खनिजांच्या जागतिक किमती वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली असून, त्याचा भार ग्राहकांवर टाकला जात आहे. डॉलरच्या विनिमय दराचा परिणामदेखली यामागे सांगितला जात आहे. भारतात संगणक घटकांबा मोठा वाटा आयातीवर अवलंबून आहे.

संगणक तज्ज्ञ अशोक गुरनाळे म्हणाले, “लघुउद्योग, कार्यालये, कोचिंग क्लासेस आणि डिजिटल व्यवसायांसाठी संगणक अत्यावश्यक असतानाही, दरवाढीमुळे नवीन खरेदी पुढे ढकलली जात आहे तसेच अपग्रेडचा खर्च वाढला आहे. विद्याथ्यांची मागणी कायम असली तरी ग्राहक स्वस्त पर्यायांकडे वळत असल्याचे चित्र आहे”.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Digital inflation semiconductor shortage computer spare parts price hike tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Computers
  • Inflation
  • Tech News

संबंधित बातम्या

लवकरच भारतात होणार धमाका! Realme P4s 5G ची लाँच डेट जाहीर… जबरदस्त फीचर्स आणि बॅटरीचा तगडा कॉम्बो
1

लवकरच भारतात होणार धमाका! Realme P4s 5G ची लाँच डेट जाहीर… जबरदस्त फीचर्स आणि बॅटरीचा तगडा कॉम्बो

OpenAI चे किशोरांसाठी खास सरप्राईज! 18 वर्षांखालील मुलांसाठी लाँच केले ChatGPT for Teens, जाणून घ्या फीचर्स
2

OpenAI चे किशोरांसाठी खास सरप्राईज! 18 वर्षांखालील मुलांसाठी लाँच केले ChatGPT for Teens, जाणून घ्या फीचर्स

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर
3

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर

6,500mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… Pova च्या नव्या स्मार्टफोनचा धमाका, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती
4

6,500mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… Pova च्या नव्या स्मार्टफोनचा धमाका, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.