फोटो सौजन्य -iStock
भारतात हल्ली ऑनलाईन शॉपिंग आणि ऑनलाईन फूडचा क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा लोकं ऑनलाईन वस्तू खरेदी करणे अधिक फायदेशीर समजतात. ऑनलाईन शॉपिंगमुळे आपला प्रवासाचा वेळ आणि पैशाची बचत होते. तर Zomato आणि Swiggy हे सर्वाधिक वापरले जाणारे ऑनलाईन फूड डिलीव्हरी अॅप आहेत. घरी जेवण बनवायला कंटाळा आला की आपण लगेच ऑनलाईन फूड डिलीव्हरी अॅपवरून जेवण ऑर्डर करतो.
Zomato आणि Swiggy या अॅपमुळे अवघ्या तासाभरात आपल्याला आपलं आवडतं जेवण मिळतं. पण आता घरातील सामान आणि जेवणासह आता दारूही ऑनलाईन ऑर्डर करता येणार आहे. त्यामुळे दारू खरेदी करण्यासाठी दुकानावर जाऊन मोठ्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही. केवळ ऑनलाईन ऑर्डर द्या आणि Zomato आणि Swiggy तुम्ही ऑर्डर केलेल्या दारूची डिलीव्हरी करतील. त्यामुळे आता पीठ आणि डाळींप्रमाणेच दारू देखील ऑनलाईन मागवता येणार आहे. पुढील काही महिन्यांत Swiggy, Zomato, Blinkit आणि बिग बास्केट दारूची डिलीव्हरी करण्यास सुरुवात करणार आहेत. ज्यामुळे तुम्ही काही मिनिटांत घरपोच दारू ऑर्डर करू शकाल. पण ही सेवा काही राज्यांसाठीच मर्यादित आहे. ज्यामध्ये दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, केरळ आणि गोवा यांसारख्या राज्यांचा समावेश आहे.
Swiggy, Zomato, Blinkit आणि बिग बास्केटवरून आता लवकरच तुम्ही घरातील सामानासह दारूही ऑर्डर करू शकता. ही सेवा दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, केरळ आणि गोवा या राज्यांपुरतीच मर्यादित आहे. Swiggy, Zomato, Blinkit आणि बिग बास्केटची ही सेवा येत्या काही महिन्यांतच सुरु होणार आहे. दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, केरळ आणि गोवा ही राज्ये सध्या दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यासाठी पायलट प्रोजेक्टवर काम करत आहेत. Swiggy, Zomato, Blinkit आणि बिग बास्केटवरून तुम्ही खाद्यपदार्थ आणि घरगुती वस्तू ऑर्डर करू शकतात. हे अॅप्स काही वेळातच तुमच्या सामानाची डिलीव्हरी करतात. आता या अॅप्सवरून तुम्हाला दारू देखील ऑर्डर करता येणार आहे.
Swiggy, Zomato, Blinkit आणि बिग बास्केट या अॅप्सवरून कोणत्याही सामानाची ऑर्डर देण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अॅप्स तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करणं. तुम्ही Google Play Store वर जाऊन हे अॅप्स तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करू शकता. तुम्हाला फक्त Play Store वरून ॲप्स इंस्टॉल करावे लागेल आणि लॉगिन करावे लागेल. ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला काही माहिती भरावी लागेल, त्यानंतर तुम्ही या ॲप्सचा सहज वापर करू शकता. तुम्ही घरातील सामान, खाद्यपदार्थ, आणि आता दारूही या अॅप्सवरून ऑर्डर करू शकता. अगदी तासाभरात तुमच्या सामानाची डिलीव्हरी केली जाईल.