Amazon Prime Day Sale: तुमच्यासाठी बेस्ट Deal... 30,000 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हे 6 ढासू स्मार्टफोन्स
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर प्राईम डे सेल सुरु झाला आहे. हा सेल म्हणजे तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफर्स उपलब्ध आहेत. ज्यामुळे प्रिमियम स्मार्टफोन तुम्हाला बजेट रेंजमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये स्मार्टफोनच्या किंमती बऱ्याच कमी झाल्या आहेत. प्राईम डे सेलमध्ये असे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, ज्याच्या किंमती 30 हजार रुपयांपेक्षा कमी आहेत. आता आम्ही अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या किंमती 30 हजार रुपयांपेक्षा कमी आहेत, पण हे स्मार्टफोन्स डिस्प्ले, मजबूत प्रोसेसर, उत्तम कॅमेरा चांगली बॅटरी लाईफ अशा अनेक फीचर्सनी सुसज्ज आहेत.
OnePlus च्या Nord CE 5 5G ची किंमत 24,998 रुपये आहे. हा एक मिड रेंज फोन असून यामध्ये 6.7 इंच फुल HD+ OLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8350 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP + 8MP डुअल रियर कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 7100mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. (फोटो सौजन्य – Pinterest)
iQOO Neo 10R ची किंमत 25,998 रुपये आहे. ज्या युजर्सना गेमिंग आणि हाय परफॉर्मेंस पाहिजे आहे, त्यांच्यासाठी हा बेस्ट स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. या डिव्हाईसमध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर आणि 6400mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोन 80W चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये 50MP + 8MP डुअल रियर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Honor 200 हा प्रीमियम बिल्ड आणि दमदार कॅमेरा सिस्टमवाला स्मार्टफोन 21,748 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.7 इंच OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेटवर आधारित आहे. फोनमध्ये 50MP + 50MP + 12MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5200mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Samsung Galaxy M36 चांगला बॅटरी बॅकअप ऑफर करतो. या स्मार्टफोनची किंमत 17,499 रुपये आहे. फोनमध्ये 6.7 इंच Super AMOLED डिस्प्ले, 120Hz का रिफ्रेश रेट आणि Exynos 1380 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनमध्ये 50MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 13MP फ्रंट कॅमेरा आहे.
Oppo F29 एक स्टाइलिश आणि बॅलेंस्ड फोन आहे, ज्यामध्ये Snapdragon 6 Gen 1 चिपसेट आहे. या फोनची किंमत 25,998 रुपये आहे. या फोनमध्ये 6.7 इंच FHD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6500mAh बॅटरी देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये 50MP + 2MP डुअल रियर कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे.
Tecno Camon 30 Premier ची किंमत 29,499 रुपये आहे. या फोनमध्ये 6.77 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी आहे, जी 70W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये 50MP + 50MP + 50MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 50MP फ्रंट कॅमेरा आहे.