Amazon Prime Day Sale: प्रिमियम ब्रँड्सच्या Smartphones वर भरगोस डिस्काऊंट, बजेट किंंमतीत घरी घेऊन या तुमचं ड्रीम डिव्हाईस
अॅमेझॉन प्राईम डे सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अनेक स्मार्टफोन्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुमचे ड्रिम स्मार्टफोन्स आता तुम्हाला अत्यंत कमी किंंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सॅमसंगपासून वनप्लसपर्यंत अनेक स्मार्टफोन्स तुम्ही ऑफर्स आणि डिस्काऊंटसह कमी किंंमतीत खरेदी करू शकता. ज्यामुळे तुम्हाला बचत करण्याची संधी देखील मिळणार आहे.
जर तुमच्याकडे ICICI क्रेडिट कार्ड किंवा SBI क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला स्मार्टफोनच्या खरेदीवर आणखी डिस्काऊंट मिळणार आहे. अॅमेझॉन प्राईम डे सेलदरम्यान ICICI क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांपर्यंतचे इंस्टेंट कॅशबॅक देखील मिळणार आहे. तर SBI क्रेडिट कार्डवर 750 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सेलमध्ये गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा (12GB+256GB) स्मार्टफोन तुम्ही 74,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. शिवाय कंपनी या स्मार्टफोनवर 52,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. याशिवाय या स्मार्टफोनवर 3000 रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिले जाणार आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना नो कॉस्ट EMI सुविधा मिळणार आहे. या फोनमध्ये 200MP चा कॅमेरा सेटअप आणि 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
अॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये तुम्ही आयफोन 16 खरेदी केल्यास तुम्हाला 46,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. याशिवाय या स्मार्टफोनवर 7000 रुपयांचे डिस्काऊंट उपलब्ध आहे. या फोनची किंमत 79,900 रुपये आहे. मात्र सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन 72,900 रुपयांत खरेदी करू शकता. ही किंमत आयफोन 16 च्या 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. फोनमध्ये 6.1 इंच डिस्प्ले आणि A18 चिप देण्यात आली आहे.
अॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये OnePlus 13R वर 35,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचा 12GB+256GB व्हेरिअंट 42,999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. या फोनवर 6 महीन्यांची NO Cost EMI सुविधा देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनसोबत ग्राहकांना 4299 रुपयांचे वनप्लस बड्स 3 फ्री दिले जाणार आहेत. परफॉर्मंससाठी Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आणि 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
IQOO Z10x 5G स्मार्टफोन अॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये केवळ 13,498 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या फोनवर NO Cost EMI सुविधा देखील उपलब्ध आहे. हा एक बजेट फोन असून यामध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.
अॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये Oppo A3X 5G स्मार्टफोन 12,499 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. या फोनवर NO Cost EMI सुविधा देखील उपलब्ध आहे.
iPhone 15 ची किंमत 79,990 रुपये आहे. मात्र सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह तुम्ही हा फोन 68,999 रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय, SBI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. तसेच, 43,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये डायनॅमिक आयलंड डिस्प्ले आहे. त्यात A18 चिप आणि USB टाइप-सी पोर्ट सारखे वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.