Amazon Vs Flipkart: कोणत्या सेलमध्ये स्वस्त मिळतोय iPhone 15? एका क्लिकवर चेक करा बंपर ऑफर्स आणि किंमत
तुम्ही देखील गेल्या अनेक महिन्यांपासून आयफोन 15 खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. आयफोन हा अनेकांचा ड्रीम फोन आहे. अनेक लोकं जास्त किंमत असल्यामुळे आयफोन खरेदी करत नाहीत, पण आता अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर 2025 चा मोठा सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनेक डिव्हाईसह आयफोन 15 वर देखील भरगोस डिस्काऊंट दिलं जाणार आहे. त्यामुळे आता तुमचा ड्रिम फोन घरी घेऊन येण्याची हीच सुवर्णसंधी आहे.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर सुरु असणाऱ्या सेलमध्ये तुम्हाला आयफोन 15 अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. अॅमेझॉन प्राईम डे सेल आणि फ्लिपकार्ट GOAT सेलमध्ये iPhone 15 हा 60 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. लास्ट जनरेशनचा हा आयफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर 10,401 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या फोनची लाँच किंमत 69,900 रुपये आहे. या फोनच्या डिल्स आणि ऑफर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
डिस्काऊंटबद्दल बोलायचं झालं तर iPhone 15 अॅमेझॉनवर 10,401 रुपयांच्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. म्हणजेच हा आयफोन तुम्ही 59,499 रुपयांना खरेदी करू शकता. एवढेच नाही तर बँक ऑफर्ससह तुम्ही या फोनच्या खरेदीवर आणखी पैसे वाचवू शकता. कंपनी SBI किंवा ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 1,000 रुपयांची सूट देत आहे, ज्यामुळे त्याची किंमत 58,499 रुपयांपर्यंत कमी होते. याशिवाय, Amazon Pay ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला 1,784 रुपयांपर्यंत सूट देखील मिळू शकते. त्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होणार आहे.
याशिवाय कंपनी या फोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते आणि ग्राहकांना कमी किंमतीत आयफोन 15 खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही तुमचे जुने डिव्हाइस एक्सचेंज करून नवीन आयफोन 15 खरेदी करणार असाल तर तुम्हाला 47,150 रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते. परंतु ही किंमत तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असते. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या फोनवर एक खास EMI पर्याय देखील देत आहे, ज्याद्वारे तुम्ही फक्त 2,885 रुपयांच्या सोप्या मंथली EMI वर डिव्हाइस खरेदी करू शकता.
अॅमेझॉनसह फ्लिपकार्टवर देखील आयफोनच्या 15 खरेदीवर खास ऑफर्स उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टवर तुम्ही हा फोन 64,900 रुपयांना खरेदी करू शकता. तथापि, येथेही बँक ऑफर्ससह तुम्ही 4000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. ही सूट HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड EMI पर्यायासह उपलब्ध आहे. ऑफर्सनंतर, फोनची किंमत 60,900 रुपये असेल. तथापि, Amazon एक खूपच चांगली डील देत आहे. Amazon प्रमाणे, Flipkart देखील 50,400 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देत आहे. त्यामुळे येथे देखील तुम्हाला हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.