
(फोटो सौजन्य- चॅटजीपीटी)
Android Users Alert: वैयक्तिक डेटा चोरी होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशातच Android स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्हीही Android फोन वापरत असाल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण फोनमधील काही सुरक्षा त्रुटींमुळे तुमचा वैयक्तिक डेटा धोक्यात येऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सी CERT-In ने Android वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
भारत सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सीने Android फोममधील काही सुरक्षा त्रुटींबाबत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यामध्ये Android 14, Android 15, Android 16, Android 16 QPR2 और Android 17 वर चालणाऱ्या उपकरणांचा समावेश आहे. एजन्सीने Android वापरकर्त्यांना शक्य तितक्या लवकर त्यांचे फोन अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
CERT-In ने या संदर्भात सुरक्षा सूचना CIVN-2026-0536 जारी केली आहे. एजन्सीच्या म्हण्यानुसार फोनच्या काही महत्त्वाच्या सिस्टिममध्ये काही त्रृटी आढळल्या आहेत. ज्याच्या गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार डिव्हाइसला टार्गेट करू शकतात. त्यामुळे, Android वापरकर्त्यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये.
CERT-In च्या अहवालानुसार, अँड्रॉइडच्या फ्रेमवर्क आणि सिस्टीमसारख्या महत्त्वाच्या भागांमध्ये अनेक सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. याचा फायदा हॅकर्सला होऊ शकतो ज्यामुळे ते आपल्या इच्छेनुसार फोनमध्ये कोड टाकून तो चालवू शकतात. विशेष म्हणजे, काही यूजरमध्ये कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करण्याची किंवा अॅप डाउनलोड करण्याची देखील आवश्यकता भासणार नाही.
PF खात्यात किती पैसे जमा आहेत? घरबसल्या मोबाईलवर मिळवा एका क्लिकमध्ये माहिती
या सगळ्यात गंभीरबाब म्हणजे जर एखाद्या सायबर गुन्हेगाराने या त्रुटींचा गैरफायदा घेतला आणि यात तो यशस्वी झाला, तर तो अशा गोष्टींपर्यंत पोहोचू शकतो. ज्यागोष्टी बाहेरच्या इतर व्यक्तींना त्याची माहिती उपलब्ध नसते. याचा थेट परिणाम उजर्सच्या वैयक्तिक माहितीवर होऊ शकोत. हॅकर्स फोनमध्ये साठवलेला महत्त्वाचा डेटा चोरू शकतात, सुरक्षित माहिती मिळवू शकतात किंवा डिव्हाइस क्रॅशसुद्धा करू शकतात.
या सगळ्यात एक दिलासादायक गोष्ट म्हणेज, गूगलने या सुरक्षा त्रुटी दूर करण्याठी एक अपडेट्स जारी केले आहेत. हे अपडेट्स कंपनीने २ नोव्हेंबर रोजी आपले नोव्हेंबर २०२६ चे अँड्रॉइड सुरक्षा बुलेटिन (Android Security Bulletin) देखील जारी केले आहे. ज्यामुळे त्यातील कमतरता आणि त्या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी सुधारणा जारी केल्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गूगलने १ नोव्हेंबर आणि ५ नोव्हेंबर २०२६ साठी सुरक्षा पॅचेस (security patches) जारी केले आहेत. केवळ अँड्रॉइडची नवीनतम आवृत्ती असणे पुरेसे नाही. तुमच्या डिव्हाइसवर कोणता सुरक्षा पॅच इंस्टॉल आहे हे तपासणे देखील महत्त्वाचे आहे.
पण, अपडेट्स सर्व स्मार्टफोन्सवर एकाच वेळी पोहोचत नाहीत. सॅमसंग, शाओमी, वनप्लस आणि इतर कंपन्या त्यांच्या फोननुसार अपडेट्स जारी करतात. त्यामुळे, काही वापरकर्त्यांना या अपडेटसाठी काही दिवस किंवा आठवडे थांबावे लागू शकते.
तुमच्या फोनला नवीन सुरक्षा अपडेट मिळाला आहे की नाही हे जाणून घ्यायचे असल्यास, तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन ते तपासू शकता.