PF (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
महागाचं पर्सनल लोन घेण्याऐवजी नोकरीतील 5 वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी स्वतःच्या किंवा जोडीदाराच्या नावावरील घराच्या दुरुस्तीसाठी PF खात्यातून ‘फॉर्म 31’ भरून पैसे काढू शकतात. आपल्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा आहे, हे तपासण्यासाठी फक्त एक मिस्ड कॉल किंवा अधिकृत उमंग अॅपचा वापर करून तुम्ही थेट स्टेटस पाहू शकता.
सणासुदीच्या किंवा नवीन वर्षाच्या काळात अनेकांना आपल्या घराचं नूतनीकरण किंवा दुरुस्ती करण्याची इच्छा असते. मात्र, ऐनवेळी पैशांची चणचण भासल्यास पर्सनल लोन घेण्याऐवजी तुमच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील जमा पुंजी हा एक उत्तम आणि स्वस्त पर्याय ठरू शकतो.
कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या काळात घराच्या दुरुस्तीसाठी पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढण्याची अधिकृत परवानगी मिळते. यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलवर फक्त 5 मिनिटांत पीएफ बॅलन्स कसा तपासायचा आणि रिनोव्हेशनसाठी पैसे काढण्याचे नियम काय आहेत, याचा हा सविस्तर गाईड. PF
कुठेही न जाता, 5 मिनिटांत मोबाईलवर PF बॅलन्स तपासण्याच्या 3 सोप्या पद्धती
तुम्हाला इंटरनेट न वापरता अवघ्या काही सेकंदांत बॅलन्स तपासायचा असेल, तर ईपीएफओच्या अधिकृत नंबरवर मिस्ड कॉल द्या.
तुमच्या पीएफ खात्याशी नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवरून 9966044425 या नंबरवर कॉल करा.
दोन रिंगनंतर कॉल आपोआप कट होईल आणि पुढील 2 मिनिटांत तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. ज्यामध्ये तुमचा यूएएन नंबर, शेवटचं योगदान आणि खात्यातील एकूण जमा रक्कम स्पष्ट दिसेल.
तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरून 7738299899 या नंबरवर EPFOHO UAN LAN (LAN म्हणजे तुमची भाषा, जसे मराठीसाठी MAR किंवा इंग्रजीसाठी ENG) असा मेसेज पाठवा.
उदा. जर तुम्हाला मराठीत माहिती हवी असेल, तर EPFOHO UAN MAR लिहून पाठवा. काही वेळातच बॅलन्सचा मेसेज येईल.
Oppo Reno 17 स्मार्टफोनचा लूक आला समोर; कॅमेरा मॉड्यूलसह दिसणार ‘ग्लोइंग कॅट’ डिझाईन, चाहते थक्क
केंद्र सरकारच्या अधिकृत UMANG App वर जाऊन ईपीएफओ सेवा निवडा. तुमचा यूएएन नंबर टाका आणि मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉगिन करा. ‘View Passbook’ वर क्लिक करून तुम्ही जमा झालेली एकूण रक्कम पाहू शकता. याशिवाय अधिकृत EPFO Member Passbook Portal ला थेट भेट देऊनही पासबुक डाऊनलोड करता येते.
बऱ्याच लोकांना वाटतं PF चे पैसे फक्त निवृत्तीनंतरच मिळतात. पण तसं नाहीये. सरकारने काही खास कारणांसाठी आधीच पैसे काढायची सोय करून दिलीये. त्यातलाच एक म्हणजे घराची दुरुस्ती.जर तुमची नोकरी 5 वर्ष पूर्ण झाली असेल, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या किंवा तुमच्या बायको / नवऱ्याच्या नावावर असलेल्या घराच्या दुरुस्तीसाठी पैसे काढू शकता. घराला रंग लावणे, छत गळत असेल तर ते ठीक करणे, टॉयलेट-बाथरूमचं काम, किंवा घरात नवीन खोलीचं काम… अशा कामांसाठी हा पैसा वापरता येतो.
यात एक नियम आहे. तुम्ही तुमच्या PF खात्यातून किती पैसे काढू शकता, हे तुमच्या जमा रकमेवर ठरतं. साधारणपणे कर्मचारी आणि कंपनीने मिळून जमा केलेली रक्कम आणि त्यावरचं व्याज, यातून काही भाग तुम्हाला मिळतो. हा पैसा परत भरावा लागत नाही. म्हणजे हे लोन नाहीये, तुमचेच पैसे आहेत.
सगळं काम ऑनलाईन होतं. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही.आधी unifiedportal-mem.epfindia.gov.in या वेबसाईटवर जा. तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. नंतर Online Services मध्ये जा आणि Claim (Form-31, 19, 10C) हा पर्याय निवडा. तिथे तुमचा बँक अकाउंट नंबर टाकून व्हेरिफाय करा. नंतर “I Want To Apply For” मध्ये PF Advance (Form 31) निवडा. कारणामध्ये “Repair of House” निवडा. किती रक्कम हवीये ते टाका आणि सबमिट करा.
आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश
तुमचा क्लेम कंपनीकडे जातो, कंपनीने मान्यता दिली की 7 ते 10 दिवसात पैसे तुमच्या बँक खात्यात येतात.एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवाPF चा पैसा हा तुमच्या म्हातारपणासाठी आहे. त्यामुळे गरज नसेल तर तो काढू नका. पण घराची खरंच गरज असेल आणि बँकेचं 14-16% व्याजाचं पर्सनल लोन घेण्यापेक्षा स्वतःच्याच PF मधून पैसे काढणं कधीही चांगलं.घराचं नूतनीकरण करताना कोणत्याही खाजगी बँकेकडून महागडं कर्ज घेण्याऐवजी, वरील अधिकृत मार्गांचा वापर करून आपला बॅलन्स तपासा आणि ईपीएफओच्या ई-सेवा पोर्टलवर ‘Form 31’ ऑनलाईन भरून रिनोव्हेशनसाठी पैशांचा क्लेम करा.






