iPhone डिझायनर Jony Ive ची मोठी घोषणा! OpenAI सोबत काम करण्यास सज्ज, लवकरच लाँच होईल नवा AI स्मार्टफोन
ऍपलचे माजी डिझायनर Jony Ive ने यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. Jony Ive आता ChatGPT तयार करणाऱ्या OpenAI सोबत काम करण्यास सज्ज आहेत. ChatGPT तयार करणाऱ्या OpenAI चे बॉस Sam Altman यांच्यासोबत आता Jony Ive चा प्रवास पाहायला मिळणार आहे. Jony Ive OpenAI च्या AI मोबाईलसाठी काम करणार आहेत. Jony Ive आणि आयफोन यांचं नातं काही नवं नाही. आयफोनचं नाव घेताच Jony Ive नेहमी डोळ्यासमोर उभा राहतो.
हेदेखील वाचा- ‘या’ बॉलीवूड सेलेब्रिटींनी खरेदी केला iPhone 16
जगभरात आयफोनची क्रेझ प्रचंड आहे. मात्र ही क्रेझ निर्माण करण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे, Jony Ive. Jony Ive ने आतापर्यंत कंपनीसाठी वेगवेगळ्या डिझाईनचे आयफोन तयार केले आहेत. आयफोनची क्रेझ तर आधीपासूनच पसरली आहे. आणि अशातच लाँच होणारे आयफोनचे वेगवेगळे डिझाईन्स ग्राहकांना आकर्षित करत होते. या सगळ्यामध्ये Jony Ive चा हात होता. मात्र आता Jony Ive आणि आयफोनचा प्रवास थांबला आहे. आता Jony Ive टेक कंपनी OpenAI सोबत करण्यासाठी सज्ज आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
ऍपल आयफोन डिझाईन करणारा मास्टरमाईंड Jony Ive याने मोठी घोषणा केली आहे. आता तो Sam Altman च्या ओपनएआय कंपनीमध्ये काम करत आहे, ज्यामध्ये तो नवीन AI डिव्हाइस विकसित करत आहे. मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती मिळाली आहे. Jony Ive ने Apple सोडले तेव्हापासून तो OpenAI मध्ये सामील होईल अशी चर्चा सुरु होती. याआधीच्या रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला होता की Jony Ive येत्या काही दिवसांत OpenAI च्या सहकार्याने AI मोबाईल तयार करत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार हे नवीन डिव्हाइस लवकरच लाँच केलं जाऊ शकतं.
हेदेखील वाचा- Android vs iPhone: iPhone मध्ये देखील मिळणार नाहीत Android स्मार्टफोन्सचे हे खास फीचर्स
OpenAI द्वारे विकसित केले जाणारे AI डिव्हाइस टेक क्षेत्राला एका नवीन उंचीवर घेऊन जाऊन शकतो. एक असं डिव्हाइस तयार केलं जात आहे, जे यापूर्वी कोणीही पाहिलं नसेल. अद्याप या डिव्हाइसबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र या प्रोजेक्टमुळे तंत्रज्ञानाच्या जगात आधीच खळबळ माजली आहे.
Jony Ive आणि Sam Altman यांची पहिली भेट Airbnb चे CEO ब्रायन चेस्की यांच्यामार्फत झाली. आता या प्रकल्पासाठी निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे. सध्या, हा उपक्रम 10 लोकांच्या अगदी लहान टीमसह काम करत आहे. Jony Ive यांनी ॲपल कंपनीत टांग टॅन आणि इव्हान्स हॅन्की यांच्यासोबतही काम केले, जे मोठे नाव आहेत. आता हे तिघेही OpenAI मध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. जोनी इव्हने 2019 मध्ये ऍपल कंपनी सोडली आणि स्वतःची कंपनी सुरू केली.
OpenAI चे ChatGPT आधीच खूप लोकप्रिय आहे. हा प्लॅटफॉर्म अमेरिका आणि भारतासह अनेक देशांमध्ये वापरला गेला आहे. येथे वापरकर्ते प्रॉम्प्ट देऊन काहीही लिहू शकतात. या प्लॅटफॉर्मवर पत्रे, कथा आणि SEO सूचना इत्यादी घेता येतील. आता लवकरच OpenAI चा स्मार्टफोन देखील लाँच केला जाणार आहे.