भारतात सध्या Apple च्या नवीन iPhone Series 16 ची खूप चर्चा आहे. अनेक लोक आयफोन 16 खरेदी करण्यासाठी तासंतास रांगेत उभे होते. इतक्या वर्षांनंतरही लोकांमध्ये iPhone ची क्रेझ कायम आहे. दरवर्षी ॲपल कंपनी आयफोनमध्ये काही ना काही बदल करून नवीन सिरीज लाँच करत असते. ॲपलप्रमाणेच अनेक टेक कंपन्या देखील त्यांचे स्मार्टफोन्स लाँच करत आहेत. iPhone प्रमाणे काही लोक Android साठी देखील क्रेझी असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत, जे iPhone युजर्सना मिळत नाहीत.
Android vs iPhone: iPhone मध्ये देखील मिळणार नाहीत Android स्मार्टफोन्सचे हे खास फीचर्स (फोटो सौजन्य - pinterest)
अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये असे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत, ज्यासाठी आयफोन यूजर्स उत्सुक आहेत. iPhone त्यांच्या युजर्सना एक नवीन फीचर्स देते. जे अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये उपलब्ध नसतात. पण अँड्रॉईड देखील त्यांच्या युजर्सना देत असलेले जबरदस्त फीचर्स आयफोन युजर्सना वापरता येत नाहीत.
Android स्मार्टफोनमध्ये कस्टमायझेशनसाठी युजर्सना अनेक पर्याय मिळतात. यासोबतच Android स्मार्टफोनमध्ये उत्तम गेमिंग अनुभवासह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, आयफोनमध्ये कस्टमायझेशनचा पर्याय पूर्वीपेक्षा चांगला झाला असून नवीन सीरिजमध्ये ही सुविधा उपलब्ध असली तरी जुन्या आयफोनमध्ये ही सुविधा उपलब्ध नव्हती.
Android स्मार्टफोनचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. अनेक कंपन्या अँड्रॉइड स्मार्टफोन बनवतात आणि जगभर विकतात. परंतु आयफोनच्या बाबतीत असे नाही.
आयफोनची निर्मिती केवळ ॲपल कंपनी करते आणि त्याला पर्याय नाही. यासोबतच अँड्रॉइड स्मार्टफोनची किंमतही कमी असते पण आयफोनसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात.
अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये स्टोरेजसाठी चांगला पर्याय आहे. याशिवाय, अनेक फोनमध्ये वेगळे SD कार्ड घालण्याचा पर्याय देखील आहे. पण आयफोनचे स्टोरेज वाढवण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये कस्टम रॉम पर्याय उपलब्ध आहे. जर तुम्हाला फोन पूर्णपणे कस्टमाइझ करायचा असेल तर तुम्ही कस्टम रॉम इन्स्टॉल करू शकता. तथापि, आयफोनमध्ये असे कोणतेही वैशिष्ट्य उपलब्ध नाही.