Apple स्वस्त iPhone लाँच करण्याच्या तयारीत, 48MP प्रायमरी कॅमेरा आणि A18 चिपने सुसज्ज
टेक जायंट कंपनी Apple लवकरच त्यांचा स्वस्त आयफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. हा नवीन आयफोन 48MP प्रायमरी कॅमेरा आणि नवीनतम A18 बायोनिक चिपने सुसज्ज असणार आहे. आयफोनची किंमत कमी असली तरी देखील त्याच्या फीचर्समध्ये फारसा फरक जाणवणार नाही, असं सांगितलं जात आहे. सध्या कंपनी नवीन आयफोन SE 4 वर काम करत आहे. लाँच करण्यापूर्वी, नवीन आयफोन SE 4 ऍपलच्या डेटाबेसमध्ये सूचीबद्ध करण्यात आला आहे. कंपनी आयफोन SE 4 पुढील वर्षी लाँच करण्याची शक्यता आहे. कमी किंमतीत लाँच होणाऱ्या आयफोन SE 4 ची रचना आयफोन 14 सारखी असू शकते.
हेदेखील वाचा- मुकेश अंबानींची खास दिवाळी ऑफर! केवळ 699 रुपयांच्या किंमतीत खरेदी करा Jio Bharat 4G फोन
काही दिवसांपूर्वीच टेक जायंट कंपनी Apple ने सर्वात प्रगत iPhone 16 सिरीज लाँच केली. या लाँचिंगनंतर Apple ने अनेक नवीन डिव्हाईसवर काम करण्यास सुरुवात केली. यापैकी एक iPhone SE 4 आहे. कंपनीने स्वस्त iPhone लाँच करण्याची घोषणा देखील केली होती. आता आयफोनचं काम सुरु करण्यात आलं आहे. इतर आयफोनच्या तुलनेत परवडणाऱ्या किमतीच्या श्रेणीमध्ये iPhone SE 4 लाँच केला जाणार आहे. लाँचिंगपूर्वी या आयफोनचे काही डिटेल्स समोर आले आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
iPhone SE चे पूर्वीचे वेरिएंट Apple ने 2022 मध्ये लाँच केले होते. यानंतर आता या सिरीजमधील iPhone SE 4 लाँच केला जाणार आहे. iPhone SE 4 चे डिझाइन iPhone 14 सारखेच असू शकते, असं सांगितलं जात आहे. या नवीन आयफोनमध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा आणि नवीनतम A18 बायोनिक चिप सारखे फीचर्स मिळणार आहेत.
अनेक रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की Apple या वर्षाच्या अखेरीस कंपनी iPhone SE 4 चे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या आसपास हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जाते की iPhone SE 4 अधिकृतपणे एप्रिल 2025 मध्ये लाँच केला शकतो. मात्र, Apple ने अद्याप याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नाही.
हेदेखील वाचा- Poco C75 लाँच, 5000 mAh बॅटरी आणि 256GB स्टोरेज सारखे फीचर्स केवळ इतक्या किंमतीत उपलब्ध
iPhone SE 4 डिव्हाईस ॲपलच्या डेटाबेसमध्ये V59 या कोडनेममध्ये सूचीबद्ध आहे. सोशल मिडीयावर कथित iPhone SE (2025) केसचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मागील पॅनलवर iPhone 7 Plus सारखे डिझाईन आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअपचा समावेश आहे. iPhone SE 4 मध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे आणि 48MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. OLED डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
नवीन iPhone SE4 ला कार्यक्षमतेसाठी नवीनतम A18 बायोनिक चिपसेट मिळू शकतो. हे 8GB LPDDR5 रॅमला सपोर्ट करेल. स्टोरेज पर्यायांमध्ये 128GB, 256GB आणि 512GB प्रकारांचा समावेश अपेक्षित आहे. मागील जनरेशन आयफोनच्या तुलनेत हा आयफोन अनेक अपग्रेड फीचर्ससह आणला जात आहे. कंपनी परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये AI वैशिष्ट्ये देखील देऊ शकते.