Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple चं भारतीयांसाठी खास गिफ्ट, ‘या’ शहरात कंपनी सुरु करणार चार नवीन स्टोअर

Apple भारतात आणखी चार नवीन स्टोअर सुरू करणार आहे. Apple ने एप्रिल 2023 मध्ये भारतात त्यांचे दोन स्टोअर सुरु केले. त्यानंतर भारतीयांमध्ये आयफोनची क्रेझ वाढत गेली. ही क्रेझ अजूनही टीकून आहे. याच सर्व गोष्टींचा विचार करता आता कंपनीने 4 नवीन स्टोअर्स सुरु करण्याचा विचार केला आहे. तसेच मेड इन इंडिया iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max ची विक्री देखील कंपनी लवकरच सुरू करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 05, 2024 | 08:21 AM
Apple चं भारतीयांसाठी खास गिफ्ट, 'या' शहरात कंपनी सुरु करणार चार नवीन स्टोअर

Apple चं भारतीयांसाठी खास गिफ्ट, 'या' शहरात कंपनी सुरु करणार चार नवीन स्टोअर

Follow Us
Close
Follow Us:

Apple पुढच्या वर्षी भारतात आणखी चार नवीन स्टोअर सुरू करण्याचा विचार करत आहे. देशात आधीच दोन Apple स्टोअर्स आहेत. अशातच आता कंपनी अजून 4 स्टोअर्स सुरू करण्याचा विचार करत आहे. पुणे, बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई या शहरात नवीन स्टोअर्स उघडण्याची कंपनीची योजना आहे. नवीन स्टोअर्स सुरू झाल्यामुळे ग्राहकांना अधिक खरेदीचे पर्याय उपलब्ध होतील, त्यामुळे भारतातील Apple ग्राहकांमध्ये वाढ होईल अशी आशा आहे. याशिवाय Apple या महिन्यात भारतात बनवलेल्या आयफोनची विक्री लवकरच सुरू करणार आहे.

हेदेखील वाचा- 5000 mAh बॅटरी आणि 256GB स्टोरेजसह Moto G75 5G लाँच, या दिवशी होणार पहिली सेल

Apple ने एप्रिल 2023 मध्ये भारतात त्यांचे दोन स्टोअर सुरु केले, पहिले दिल्लीत आणि दुसरे मुंबईत. त्यांनतर आता ॲपल भारतात आपले स्टोअर वाढवण्याचा विचार करत आहे. कंपनी येत्या काही दिवसांत पुणे, बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई येथे चार नवीन स्टोअर सुरु करणार आहे. कंपनीने सांगितलं की, या महिन्यात ते मेड इन इंडिया iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max ची विक्री सुरू करणार आहे. त्यामुळे ग्राहक प्रचंड उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)

भारतात Apple ची नवीन स्टोअर्स सुरू होण्याबाबत Apple ने सांगितले की, आम्ही भारतात नवीन स्टोअर सुरू करण्याचा विचार करत आहोत. देशभरातील आयफोनच्या क्रेझपासून प्रेरित होऊन आम्ही ही योजना बनवत आहोत. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, भारतात बनवलेले iPhone 16 Pro आणि Pro Max लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होतील.

Apple रिटेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष डियर्डे ओब्रायन यांनी एका निवेदनात सांगितले की, आम्हाला कंपनीची सेवा सुधारायची आहे आणि ग्राहकांच्या प्रश्नांचे त्वरीत निराकरण करायचे आहे. पुढील वर्षी ही दुकाने सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीने असेही जाहीर केले की ती आता भारतात आयफोन 16 सिरिजमधील स्मार्टफोन तयार करेल.

हेदेखील वाचा- गुगलने लाँच केले AI पॉवर्ड समरी कार्ड, Gmail वापरकर्त्यांना मिळणार फायदा, काम होणार अधिक सोपे

2017 मध्ये आयफोनचे भारतात पदार्पण

Apple आता भारतात iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max यासह संपूर्ण iPhone 16 लाइनअपचे प्रोडक्ट्स तयार करत आहे. Apple ने 2017 मध्ये भारतात आयफोनचे उत्पादन सुरू केले होते.

लवकरच iPhone SE 4 लाँच होणार

Apple ने गेल्या महिन्यात आपला नवीनतम iPhone 16 लाइनअप लाँच केला. आता सांगितलं जात आहे की कंपनी आपल्या परवडणाऱ्या iPhone SE चे नवीन व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने 2016 मध्ये पहिल्यांदा iPhone SE लाँच केला होता. त्याचे दुसरे व्हेरिएंट 2020 मध्ये आणि तिसरे व्हेरिएंट 2022 मध्ये लाँच करण्यात आले. त्यांनतर आता iPhone SE चा चौथा व्हेरिएंट लाँच केला जाणार आहे.

2025 मध्ये चौथे व्हेरिएंट लाँच केले जाऊ शकते. iPhone SE 4 चे डिझाईन आयफोन 14 सारखे असू शकते. iPhone SE 4 अनेक अपग्रेडसह लाँच केला जाईल. हार्डवेअरमध्ये व्यापक बदल केले जाऊ शकतात, असा दावा अहवालात केला जात आहे. यासोबतच फोनचा डिस्प्लेही मोठा असेल. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की यामध्ये Apple Intelligence सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.

Web Title: Apple will open four new apple stores in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 08:21 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.