5000 mAh बॅटरी आणि 256GB स्टोरेजसह Moto G75 5G लाँच, या दिवशी होणार पहिली सेल
आघाडीची टेक कंपनी मोटोरोलाने आपल्या G मालिकेतील एक नवीन फोन जागतिक बाजारपेठेत लाँच केला आहे. Moto G75 नावाचा स्मार्टफोन मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे. हा जगातील पहिला फोन आहे ज्यामध्ये क्वालकॉमचा Snapdragon 6 Gen 3 चिपसेट स्थापित करण्यात आला आहे. फोनचा लूक आणि डिझाईन अतिशय प्रमियम आहे. त्यामुळे फोनला हातात घेताच स्टायलिश लूक मिळतो. या फोनची विक्री 5 नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्याचे सांगितलं जात आहे. सध्या हा फोन जागतिक बाजारात लाँच करण्यात आला असून येत्या काही दिवसांतच कंपनी Moto G75 स्मार्टफोन भारतात आणि चिनमध्ये देखील लाँच करू शकते.
हेदेखील वाचा- X युजर्सना धक्का! आता ही सुविधा होणार बंद, Elon Musk ने केली मोठी घोषणा
नवीनतम Moto G75 फोनमध्ये फ्लॅट एज डिस्प्ले आहे. यात पॉलीकार्बोनेट चेसिससह बॉक्सी डिझाइन आहे. सुरक्षेसाठी, यात गोरिला ग्लास 5 संरक्षण देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन Charcoal Grey (matte), Succulent Green (vegan leather) आणि Aqua Blue या रंगांच्या पर्यांयामध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये यूएसबी पोर्ट आणि डॉल्बी ॲटमॉससह स्टिरिओ स्पीकर आहेत. विशेष म्हणजे फोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी IP68 रेटिंग आणि अतिरिक्त सुरक्षेसाठी MIL-STD-810H मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन आहे. (फोटो सौजन्य – मोटोरोला)
Moto G75 फोनमध्ये 6.78-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 1,000 nits पर्यंत उच्च ब्राइटनेस मोड आणि वॉटर टच वैशिष्ट्यांना सपोर्ट करतो. फोनचा लूक आणि डिझाईन अतिशय प्रमियम आहे.
Snapdragon 6 Gen 3 चिपसेटवर चालणारा Moto G75 हा जगातील पहिला फोन आहे. ही 4nm चीप आहे.
हेदेखील वाचा- तुमच्या फोनमधून ‘हे’ धोकादायक ॲप्स लगेच डिलीट करा, छोटीशी चूकही तुम्हाला अडचणीत आणू शकते
Moto G75 फोन MyUX स्किनसह Android 14 बूट करतो. मोटोरोलाने 5 वर्षे OS अपग्रेड आणि सहा वर्षांच्या सुरक्षा अद्यतनांचे वचन दिले आहे.
Moto G75 मध्ये 8GB LPDDR4x रॅम आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज आहे. याशिवाय व्हर्च्युअल रॅम आणि मेमरी कार्ड वापरून स्टोरेज 8GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
Moto G75 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 30W TurboPower वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा (Sony LYTIA 600 सेन्सर), OIS सह 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा सेन्सर आहे. यात 16MP सेल्फी शूटर आहे.
फोनची विक्री ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. येत्या काही दिवसांत हा फोन चीन आणि भारतासारख्या बाजारपेठेतही प्रवेश करू शकतो. हा फोन युरोपमध्ये PLN 8,999 म्हणजेच अंदाजे 33,317 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Charcoal Grey (matte), Succulent Green (vegan leather) आणि Aqua Blue या रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे.