आयफोन युजर्ससाठी Apple Intelligence सोबत डिसेंबरमध्ये येणार iOS 18.2 अपडेट, बीटा चाचणी लवकरच सुरु होणार
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आयफोन वापरकर्त्यांसाठी iOS 18.1 अपडेट रिलीज केलं जाणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. मात्र iOS 18.1 रिलीज होण्यापूर्वीच iOS 18.2 अपडेटविषयी माहिती समोर आली आहे. iOS 18.2 अपडेट डिसेंबरमध्ये युजर्ससाठी रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. त्यात प्रायोरिटी नोटिफिकेशनच्या सुविधेसह अनेक नवीन गोष्टी असतील. iOS 18.1 अपडेटमध्ये ॲपल इंटेलिजन्ससह अनेक नवीन फीचर्स देण्यात येणार आहेत.
फोटो सौजन्य – Elon Musk च्या स्पेसएक्सने लाँच केलं मेगा स्टारशिप रॉकेट, काय आहे मस्कची योजना? वाचा सविस्तर
iOS 18.1 अपडेट पुढील काही आठवड्यांमध्ये आयफोन युजर्ससाठी रिलीज होणार आहे. हे अपडेट भारतीय युजर्ससाठी 28 ऑक्टोबर रोजी अनेक नवीन वैशिष्ट्यांसह आणले जाईल. अलीकडेच त्याचे बीटा व्हर्जनही रिलीज करण्यात आले आहे. हे अपडेट येण्याआधी, पुढील iOS 18.2 अपडेटबाबतही माहिती समोर आली आहे. (फोटो सौजन्य – X)
iOS 18.1 च्या रोलआउटनंतर, iOS 18.2 देखील डिसेंबरमध्ये रोलआउट केले जाण्याची शक्यता आहे. अनेक नवीन फिचर्ससोबतच ‘ऍपल इंटेलिजन्स’चे सर्व फिचर्स यामध्ये उपलब्ध असतील. नवीन अपडेट आल्यानंतर, केवळ iPhone 16 युजर्सनाच नाही तर अनेक जुन्या iPhones ला देखील हे अपडेट मिळणार आहे.
अहवालानुसार, Apple 28 ऑक्टोबरला iOS 18.1 रिलीज करणार असल्याचे सांगितलं जात आहे. iOS 18.2 साठी बीटा चाचणी लवकरच सुरू होईल, डिसेंबरपर्यंत चालेल. ॲपल यानंतर लोकांसाठी iOS 18.2 रिलीज करेल अशी अपेक्षा आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ते बाजारात आणले जाऊ शकते.
iOS 17.2 अपडेट 11 डिसेंबर 2023 रोजी रिलीज करण्यात आलं होतं. iOS 16.2 13 डिसेंबर 2022 रोजी रिलीज करण्यात आलं होतं. iOS 15.1 अपडेट 13 डिसेंबर 2021 रोजी रिलीज करण्यात आलं होतं.
iOS 18.1 अपडेटप्रमाणे, iOS 18.2 देखील ऍपल इंटेलिजेंस वैशिष्ट्यांसह पॅक केले जाईल. या अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्स उपलब्ध होतील. जसे की, जीनोमिक्स, ChatGPT एकत्रीकरण, इत्यादी.
फोटो सौजन्य – Oppo घेऊन येतोय 6400 mAh बॅटरीवाला जबरदस्त स्मार्टफोन, या दिवशी सुरु होणार सेल
Apple या वर्षाच्या शेवटी iOS 18.2 मध्ये प्रायोरिटी नोटिफिकेशनची सुविधा देखील प्रदान करू शकते. तुमच्या सूचना स्टॅकच्या टॉपला प्रायोरिटी नोटिफिकेशन दिसून येतील. यामुळे महत्त्वाच्या नोटिफिकेशन वाचणे सोपे होईल.
iOS 18.2 मध्ये नवीन मेल ॲप डिझाइन देखील असेल. त्याची एक झलक जूनमध्ये झालेल्या WWDC मध्ये पाहायला मिळाली. मेल ॲपमध्ये एक नवीन ‘डायजेस्ट व्ह्यू’ जोडला जाईल.
याशिवाय, अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी Apple ने जाहीर केली आहेत, परंतु अद्याप सादर केलेली नाहीत. अशा परिस्थितीत, हे फीचर्स पुढील iOS 18.2 अपडेटमध्ये समाविष्ट केले जातील. यामध्ये मुख्यतः होम ॲपमध्ये रोबोट व्हॅक्यूम सपोर्टचा समावेश आहे. तसेच, एअरपॉड्स प्रो 2 साठी नवीन हियरिंग हेल्थ फीचरच्या अधिकृत लाँचची देखील प्रतीक्षा आहे.