Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपडेट छोटं, पण बदल मोठे! आयफोन यूजर्ससाठी iOS 26.3 अपडेट रोलआउट, नवीन फीचर्स पाहून तुम्हीही लगेच कराल डाउनलोड

iPhone iOS 26.3 Update: आयफोन यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन आणि अनोखं अपडेट घेऊन आली आहे. यामध्ये .यूजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार असल्याचा दावा केला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 13, 2026 | 03:30 PM
अपडेट छोटं, पण बदल मोठे! आयफोन यूजर्ससाठी iOS 26.3 अपडेट रोलआउट, नवीन फीचर्स पाहून तुम्हीही लगेच कराल डाउनलोड

अपडेट छोटं, पण बदल मोठे! आयफोन यूजर्ससाठी iOS 26.3 अपडेट रोलआउट, नवीन फीचर्स पाहून तुम्हीही लगेच कराल डाउनलोड

Follow Us
Close
Follow Us:
  • iPhone यूजर्ससाठी खुशखबर!
  • iOS 26.3 अपडेट रिलीज
  • iOS 26.3 मध्ये मिळाले दमदार सिक्युरिटी अपडेट्स
टेक जायंट कंपनी Apple ने त्यांच्या आयफोन मॉडेल्ससाठी लेटेस्ट iOS 26.3 जारी केले आहे. त्यामुळे आता आयफोन युजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार आहे. इतकंच नाही तर कंपनीने iPadOS 26.3 देखील रिलीज केले आहे. सुमारे 2 महिन्यांपूर्वी कंपनीने iOS 26.2 रिलीज केले होते. यानंतर आता कंपनी आयफोन युजर्ससाठी पुन्हा एकदा एक नवीन अपडेट घेऊन आली आहे. अ‍ॅपलने त्यांच्या लेटेस्ट iOS 26.3 अपडेटबाबत सांगितलं आहे की, यामध्ये अनेक बग फिक्स आणि सिक्योरिटी इंप्रूवमेंट्सवर काम करण्यात आले आहे. तसेच कंपनीने या अपडेटमध्ये काही नवीन फीचर्स देखील जोडले आहेत.

Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…

आयफोनवरून अँड्राईडवर स्विच करणं झालं सोपं

iOS 26.3 मधील सर्वात हाइलाइटेड फीचरबाबत कंपनीने सांगितले आहे की, युजर्स अ‍ॅपल डिव्हाईसवरून अँड्रॉइड डिव्हाईसवर अगदी सहजपणे स्विच करू शकतात. या नव्या फीचरनंतर यूजर्स न्यू डिवाइस सेटअप प्रोसेसदरम्यान डेटा ट्रान्सफर करू शकतात. या नव्या फीचरच्या मदतीने यूजर्स फोटो, मेसेज, नोट्स, अ‍ॅप्स, पासवर्ड, फोन नंबर आणि दुसरा डेटा अ‍ॅपल डिव्हाईसवरून अँड्रॉइडवर ट्रान्स्फर करू शकतात. यामुळे अ‍ॅपलहून अँड्राईडवर स्विच करण्याची प्रोसेस अगदी सोपी झाली आहे आणि यामध्ये युजर्सचा डेटा देखील सुरक्षित राहतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

लोकेशन ट्रॅकिंगवर मिळणार कंट्रोल

MacRumors ने त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, iOS 26.3 सह यूजर्स कैरियर लोकेशन ट्रॅकिंगसाठी लिमिट सेट करू शकतात. हे फीचर सध्या काही ठराविक नेटवर्क ऑपरेटर्ससह उपलब्ध आहे. बूस्ट मोबाइल अमेरिकेत, टेलिकॉम जर्मनीमध्ये आणि एआयएस आणि ट्रू थायलंडमध्ये याला समर्थन देते. हे वैशिष्ट्य फक्त अ‍ॅपलचे C1 किंवा C1X मोडेम वापरणाऱ्या डिव्हाइसेसवरच काम करेल.

थर्ड पार्टी वीयरेबल्स सपोर्ट

अ‍ॅपलने थर्ड-पार्टी वीयरेबल्स जसे स्मार्टवॉच आणि हेडफोन फीचर यूरोपमध्ये सक्षम केले आहे. आता युजर्स त्यांच्या आयफोनमधून केवळ एका क्लिकवर थर्ड-पार्टी एक्सेसरीज कनेक्ट करू शकणार आहेत. यासोबतच थर्ड-पार्टी स्मार्टवॉचमध्ये यूजर्सना आईफोनमधून नोटिफिकेशन देखील मिळणार आहेत.

नवीन वेदर वॉलपेपर

कंपनीने या नव्या अपडेटसोबतच नवीन वेदर वॉलपेपर देखील सादर केला आहे. या वॉलपेपरची लॉक-स्क्रीन यूजर्स त्यांच्या आवडीनुसार कस्टमाइज करू शकणार आहेत. यापूर्वी आयफोनमध्ये वेदर आणि एस्ट्रोनॉमी एकत्र सिंगल कॅटेगरीमध्ये पहायला मिळत होती. मात्र आता कंपनीने वेदर वेगळे केले आहे.

Honor X6d: स्मार्टफोनचे बजेट सेगमेंट हादरले! पावरफुल बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरसह नव्या डिव्हाईसची एंट्री, किंमत खिशाला परवडणारी

कोणत्या आयफोन मॉडेल्सना मिळणार अ‍ॅपल iOS 26.3 अपडेट

iOS 26.3 अपडेट आयफोन 11 आणि त्यानंतर लाँच झालेला आयफोन मॉडेलमध्ये इंस्टॉल केले जाऊ शकते. नवीन अपडेट डाउनलोड करण्यासाठी युजर्सना आयफोन सेटिंगमध्ये जावे लागेल, जिथे अपडेट इंस्टॉल करण्याचा पर्याय दिसेल. अपडेट डाऊनलोड करण्यासाठी यूजर्सना आयफोनमध्ये सेटिंग मेन्यूमध्ये जाऊन जनरल आणि नंतर सॉफ्टवेयर अपडेटवर क्लिक करावे लागेल.

Web Title: Small update can make big changes apple rolls out ios 263 for iphone users with exciting new features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • apple
  • Apple iOS
  • iphone

संबंधित बातम्या

भारतातील या शहरात सुरु होणार नवं Apple स्टोअर! कधी होणार ओपनिंग? जाणून घ्या सविस्तर
1

भारतातील या शहरात सुरु होणार नवं Apple स्टोअर! कधी होणार ओपनिंग? जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy S26 Ultra vs iPhone 17 Pro Max: कोण आहे खरा कॅमेरा किंग? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा हे महत्त्वाचे फरक
2

Samsung Galaxy S26 Ultra vs iPhone 17 Pro Max: कोण आहे खरा कॅमेरा किंग? खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा हे महत्त्वाचे फरक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.