Diwali Celebration 2024: दिवाळीत गिफ्ट देण्यासाठी पर्याय शोधताय? या उत्तम स्मार्टफोन ॲक्सेसरीज तुमची नक्की मदत करतील
दिवाळीला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदाच्या दिवाळीत तुम्हाला तुमच्या भावंडांना तुमच्या मित्र मैत्रिनींना काही वेगळं गिफ्ट द्यायचं असेल, तर तुम्ही स्मार्टफोन ॲक्सेसरीजचा ट्राय करू शकता. स्मार्टफोन कव्हर, पॉवर बँक, इअरबड्स, मिनी स्मार्टफोन प्रोजेक्टर, असे बरेच ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. यातील कोणतंही गिफ्ट प्रत्येकासाठीच फायदेशीर ठरणार आहे.
हेदेखील वाचा- Google Map Update: गुगल मॅपवर तुमचं आवडतं ठिकाण करा मार्क, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
दिवाळीचा सण जवळ आला आहे आणि या प्रसंगी आपले कुटुंब, मित्र आणि प्रियजनांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. तुमच्या कुटुंबात किंवा मित्रांमध्ये स्मार्टफोन प्रेमी असल्यास, त्यांना या दिवाळीत स्मार्टफोन ॲक्सेसरीज गिफ्ट करणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. येथे काही टॉप स्मार्टफोन ॲक्सेसरीज आहेत ज्या दिवाळीला भेट म्हणून दिल्या जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – pinterest)
आजकाल वायरलेस इअरबड्सचा ट्रेंड सुरु आहे. बस, ट्रेन, रिक्षा, सर्वत्र तुम्हाला तरूणांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वचजण वायरलेस इअरबड्सचा वापर करताना दिसतील. वायरलेस इअरबड्स केवळ उच्च-गुणवत्तेचा आवाजच देत नाहीत, तर गाणी ऐकताना एअरफोनच्या वायरचा त्रास देखील होत नाही. बाजारात सॅमसंग गॅलेक्सी बड्स, ऍपल एअरपॉड्स आणि रियलमी बड्स सारख्या अनेक चांगल्या ब्रँडचे इयरबड्स उपलब्ध आहेत, जे गिफ्टिंगसाठी उत्तम पर्याय आहेत. दिवाळी ऑफरमध्ये तुम्ही अगदी कमी आणि परवडणाऱ्या किंमतीत उत्तम इअरबड्स खरेदी करू शकता.
प्रत्येक स्मार्टफोन युजर्ससाठी पॉवर बँक ही एक आवश्यक ॲक्सेसरी आहे. जर तुमच्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला फोनची बॅटरी संपण्याची समस्या वारंवार येत असेल, तर त्यांना उच्च क्षमतेची पॉवर बँक भेट देणे ही खूप उपयुक्त भेट ठरू शकते. Xiaomi, Anker आणि Realme सारख्या ब्रँड्सच्या पॉवर बँक्स गिफ्टींगसाठी चांगले पर्याय असू शकतात.
हेदेखील वाचा- Google Pay Diwali Offer: युजर्सना मिळणार 1001 रुपयांपर्यंत कॅशबॅक, फक्त करावे लागेल हे काम
फॅशनेबल आणि प्रोटेक्टिव फोन केसेस किंवा कव्हर्स कोणत्याही स्मार्टफोनला नवीन लुक देतात. कस्टमाइजड फोन केसेस देखील दिवाळीच्या निमित्ताने एक उत्तम भेट ठरू शकतात. हे केवळ फोन सुरक्षित ठेवत नाहीत तर तो स्टायलिश देखील बनवतात. तसेच तुम्ही निअर-फील्ड कम्युनिकेशन स्मार्टफोन केसेस देखील गिफ्ट करू शकता. तरूणांमध्ये निअर-फील्ड कम्युनिकेशन स्मार्टफोनची केसेसची प्रचंड क्रेझ आहे. या केसेसचे वैशिष्ट्य म्हणजे ते युजर्सना त्यांच्या आवडीचे फोटो किंवा ग्राफिक्स त्यांच्या फोनच्या मागील बाजूस प्रदर्शित करण्याची परवानगी देतात.
फास्टर चार्जर देखील एक चांगली आणि उपयुक्त भेट असू शकते. याच्या मदतीने फोन लवकर चार्ज होऊ शकतो, जे आजच्या व्यस्त जीवनात खूप महत्वाचे आहे. सॅमसंग, वनप्लस आणि ऍपलचे फास्टर चार्जर दिवाळीच्या उत्तम भेटवस्तू ठरू शकतात.
तुमचे मित्र किंवा कुटुंब चित्रपट प्रेमी असल्यास, एक मिनी स्मार्टफोन प्रोजेक्टर त्यांना आनंदी करू शकतो. ते फोनशी सहज कनेक्ट केले जाऊ शकते आणि कोणत्याही ठिकाणी चित्रपट किंवा व्हिडिओंचा आनंद घेता येतो.