Google Map Update: गुगल मॅपवर तुमचं आवडतं ठिकाण करा मार्क, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
गुगल मॅपवर अशी अनेक फीचर्स आहेत ज्यांच्या मदतीने तुमच्या आवडत्या ठिकाणी जाणं अगदी सोपं होतं. आता आम्ही तुम्हाला अशा एका फीचबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही गुगल मॅपवर तुमचं आवडतं ठिकाण मार्क करू शकता आणि सेव्ह देखील करू शकता. ही संपूर्ण प्रोसेस अगदी सोपी आहे. गुगलने आपल्या युजर्ससाठी अनेक खास फीचर्स आणली आहेत, जी अनेक लोक वापरतात. अशाच एका सुविधेत गुगल मॅप्सचीही गणना होते. गुगल मॅप तुम्हाला तुमचा मार्ग शोधण्यात, नेव्हिगेट करण्यात मदत करते.
हेदेखील वाचा- Google Map Update: आता गुगल मॅप रस्त्याची रुंदीसुध्दा सांगणार, 8 शहरांमध्ये सुरू होतेय नवी सुविधा
गुगल मॅप्स तुम्हाला सेव्ह प्लेसेस नावाचा एक पर्याय देतो, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणांपैकी कोणतीही ठिकाणे सहजपणे मार्क करू शकता. मग ते कॅफे असो किंवा पिकनिक स्पॉट. तुम्ही कोणतंही ठिकाण अगदी क्षणाधार्त मार्क करू शकता. पण यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कोणत्या वेगाने गाडी चालवावी हे देखील या फीचरमध्ये सांगितलं जाणार आहे. हे फीचर तुम्हाला सांगेल की तुमच्यासाठी कोणता मार्ग चांगला आहे आणि तुम्ही तुमचे वाहन कोणत्या वेगाने चालवावे.गुगल मल्टी-कार नेव्हिगेशन फीचर (गुगल मॅप्स नवीन फीचर) केवळ स्मार्टफोनवरच उपलब्ध होणार नाही, तर यूएसबी किंवा ब्लूटूथद्वारे कनेक्ट केलेल्या कार उपकरणांवरही काम करेल.






