Google Pay Diwali Offer: युजर्सना मिळणार 1001 रुपयांपर्यंत कॅशबॅक, फक्त करावे लागेल हे काम
Google Pay Diwali Offer: गूगल पेने दिवाळीनिमित्त यूजर्साठी खास कॅशबॅक ऑफर लाँच केली आहे. या ऑफरमध्ये, गूगल पे युजर्सना 1001 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. या ऑफरसाठी, युजर्सना गूगल पे ट्रांजेक्शनवर लाडू गोळा करावे लागणार आहेत. सहा प्रकारचे लाडू गोळा केल्यानंतर गूगल पे युजर्स कॅशबॅकचा दावा करू शकतात.
हेदेखील वाचा- BSNL चा बेस्ट अॅन्युअल रिचार्ज प्लॅन! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग
दिवाळीच्या मुहूर्तावर गुगल पेने युजर्ससाठी खास ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये, कंपनी युजर्सना 1001 रुपयांचा कॅशबॅक देणार आहे. या ऑफरमधे गूगल पे युजर्सना प्रत्येक ट्रांजेक्शनवर सहा प्रकारचे लाडू मिळणार. हे लाडू रिडीम करून, गूगल पे युजर्स कॅशबॅक मिळवू शकतात. येथे आम्ही तुम्हाला गूगल पेवर उपलब्ध असलेल्या या कॅशबॅक ऑफरबद्दल तपशीलवार माहिती देत आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
गूगल पेच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, युजर्स दिवाळी ऑफरमध्ये 1,001 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. युजर्सना 51 ते 1,001 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. यासाठी गूगल पे युजर्सना किमान सहा लाडू जमा करावे लागणार आहेत.
गूगल पे युजर्सना जास्तीत जास्त ट्रांजेक्शन करून सहा प्रकारचे लाडू गोळा करावे लागणार आहेत. तसेच युजर्स त्यांच्या मित्र किंवा कुटुंबाकडून देखील लाडू मागवू शकतात. या ऑफर्साठी क्वालिफाय होण्यासाठी युजर्सकडे 7 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी असेल.
गूगल पे वर स्कॅन केल्यावर आणि व्यापाऱ्याला UPI पेमेंट केल्यावर लाडू मिळणार आहेत. पण हा पेमेंट किमान 100 रुपयांचा आसला पाहिजे. मोबाईल रिचार्ज किंवा पोस्टपेड बिल पेमेंट वर देखील लाडू मिळणार आहे. याची किमान किंमत देखील 100 रुपये असली पाहिजे. क्रेडिट कार्ड बिल पेमेंट वर देखील लाडू मिळणार आहे. हा पेमेंट किमान 3,000 रुपयांचा आसला पाहिजे. गिफ्ट कार्ड खरेदी केल्यावर देखील लाडू मिळणार आहे. हा पेमेंट किमान 200 रुपयांचा असणं आवश्यक आहे.
हेदेखील वाचा- भाऊबिजेच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या भावा – बहिणींना गिफ्ट करा हे भन्नाट स्मार्टफोन्स
यासह, युजर्स त्यांच्या मित्राकडून किंवा कुटुंबातील सदस्याकडून बोनस लाडू मागू शकतात. अशा प्रकारे, सर्व सहा प्रकारचे लाडू गोळा केल्यावर वापरकर्ते कॅशबॅकचा दावा करू शकतात. पण, युजर्सना गूगल पेद्वारे एकाच व्यापाऱ्याला किंवा एकाच अकाऊंटवर एकापेक्षा अधिक वेळा पेमेंट केल्यावर लाडू मिळणार नाहीत. यासोबतच तुम्ही गूगल पेद्वारे सोने, विमा किंवा अॅमेझॉन पे गिफ्ट कार्ड खरेदी केले तरीही तुम्हाला लाडू मिळणार नाहीत.
युजर्स गुगल पे ॲपवर लाडू कलेक्शन सहज ट्रॅक करू शकतात. यासाठी त्यांना होमपर्यंत खाली स्क्रोल करावे लागेल आणि ऑफर्स आणि रिवॉर्ड सेक्शन मध्ये जावे लागेल. इथे तुम्हाला Laddoos! या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे युजर्स त्यांच्या अकाउंट मध्ये असलेले लाडू पाहू शकतील. जास्तीत जास्त लाडू गोळा करण्यासाठी त्यांना अनेक व्यवहार करावे लागतील. एकदा सर्व लाडू गोळा केल्यावर, युजर्सना Laddoos सेक्शन मध्ये जाऊन क्लेम फायनल रिवॉर्ड पर्यायावर टॅप करावे लागेल आणि क्लेम रिवॉर्डवर क्लिक करावे लागेल.