Meta policy: Using Facebook? Be careful! Sharing photos and videos of others will result in penalties, Meta has taken a big decision..
Meta policy : फेसबुक वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. युट्युबनंतर आता मेटाने देखील आता फेसबुकवर सातत्याने कॉपी कंटेन्ट शेअर करणाऱ्या खात्यांविरोधात कठोर धोरण आखण्याची घोषणा केली आहे. मेटा कंपनीकडून सांगण्यात आले आहे कि, जी खाती वारंवार आपल्या खात्यावरुन इतरांचे टेक्स्ट, फोटो आणि व्हिडीओ फॉरर्वड वा शेअर करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
मेटाकडून सांगण्यात आले आहे की, त्यांनी आतापर्यंत सुमारे एक कोटी फेक खाती हटवण्यात आली आहेत. जी मोठ्या कंटेन्ट क्रिएटर्सची कॉपी करत होती. तसेच मेटाकडून अशा ५ लाख खात्यांविरोधात कारवाई केली आहे. जी स्पॅम वा फर्जी एंगजमेंटममध्ये सामील असल्याचे दिसून अली आहेत. या कारवाईत अशा खात्यांच्या कमेंट्स डिमोट करून त्यांचा कंटेन्टचा रिच मर्यादित करणे या कारवायांचा सामावेश आहे.
मेटाकडून सांगण्यात आले आहे की, ते अशा युजरना लक्ष्य करणार नाहीत ज्यांच्या कोणाचा कटेन्टवर रिएक्शन व्हिडीओ बनवत असतात. ट्रेंड्समध्ये भाग घेत असतात. तसेच आपली प्रतिक्रीया देतात. मेटाचा त्या खात्यांना लक्ष्य करणार आहे जे मुद्दाम दुसऱ्यांच्या कटेन्टची कॉपी करुन शेअर करीत असतात. मग ती खाती कोणतीही असो. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार.
अशा खात्यांचा मॉनिटायझेशन सुविधा देखील बंद करण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या पोस्ट्सची रिच घटवली जाऊन त्यांना फेसबुकच्या शिफारसींशी हटवले जाणार आहे. मेटा आता डुप्लिकेट व्हिडीओना ओळखून त्यांचे वितरणही कमी करणार आहे. त्यामुळे त्याच्या मुळ क्रिएटरला क्रेडिट आणि व्यूज मिळण्यास अडचण येणार नाही.
हेही वाचा : घाई करा! केवळ ‘इतक्या’ हजारांत व्हा iPhone चे मालक; Flipkart च्या सेलमध्ये बंपर डिस्काउंट, पहा ऑफर्स
मेटाकडून थेट एआय स्लोपचा देखील उल्लेख करण्यात आले नाही. परंतू त्याच्या मूळ मजकूरासाठी देण्यात आलेल्या सल्ल्यावर स्पष्ट सांगण्यात आले आहे कि, केवळ क्लिप्स जोडून किंवा वॉटरमार्क लावून कटेन्ट बनवू नका, ऑथेंटिक स्टोरीटेलिंगवर देखील लक्ष द्या. तसेच असे व्हिडीओ बनवू नका ज्यामध्ये स्पष्ट व्हॅल्यू नसणार आहे. एकूणच एआयने बनवलेले रिपिटेटीव्ह व्हिडीओ देखील मेटाच्या निशाण्यावर असणार आहे.
मेटाकडून सांगण्यात आले आहे कि, हे बदल हळूहळू लागू होणार आहेत. ज्यामुळे क्रिएटर्सजवळ स्वत:ला एडजस्ट करायला खूप वेळ मिळणार आहे. क्रिएटर्सना जर माहिती घ्यायची असेल तर त्यांचा कंटेन्ट कमी का व्हायरल होत आहे, ते फेसबुकच्या प्रोफेशनल डॅशबोर्डला जाऊन नवीन पोस्ट – लेव्हल इनसाईट्स देखील बघू शकतील. तसेच क्रिएटर्सना सपोर्ट सेक्शनमध्ये दिसणार आहे कि, ते कोणाच्या धोक्यात तर नाही ना.
एआयच्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नकली, रिपीट गेलेला आणि कमी व्हॅल्यू असणारा कंटेन्ट झपाट्याने वाढत आहे. युट्युबने आधीच या संदर्भात कठोर कारवाई करण्याची तयारी केली आहे. आता मेटा देखील आपल्या प्लॅटफॉर्मची गुणवत्ता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : AI आणि नाविन्यता यांचा संगम: सॅमसंगने मुंबईत ‘फ्युचर-फॉरवर्ड बिझनेस एक्स्पेरिअन्स स्टुडिओ’चे केले उद्घाटन