फोटो सौजन्य - Social Media
सॅमसंग या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने मुंबईच्या गोरेगाव येथील ओबेरॉय कॉमर्झ-२ च्या २८व्या मजल्यावर अत्याधुनिक बिझनेस एक्स्पेरिअन्स स्टुडिओ (BES) सुरू केला आहे. हा ६,५०० चौरस फूटाचा स्टुडिओ व्यवसायांना एकत्रित, एआय-सक्षम डिजिटल सोल्युशन्सचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
BES हे गुरुग्राम येथील सॅमसंग एक्झिक्युटिव्ह ब्रिफिंग सेंटरनंतरचे दुसरे केंद्र आहे, जे B2B ग्राहकांना स्मार्ट क्लासरूम्स, पेपरलेस बँकिंग, ऑटोमेटेड हॉटेल्स आणि आरोग्य सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण सोल्युशन्सचे प्रत्यक्ष प्रदर्शन करते. सॅमसंग साउथ वेस्ट एशियाचे अध्यक्ष जे. बी. पर्क यांनी सांगितले की, “सॅमसंगमध्ये आमचा विश्वास आहे की व्यवसायांचे भविष्य सर्वोत्तम अनुभवांशी संबंधित आहे, जे मानवी-केंद्रित, कनेक्टेड व शाश्वत आहे. मुंबईतील बिझनेस एक्स्पेरिअन्स स्टुडिओमधून हा दृष्टिकोन दिसून येतो. या शोरूममध्ये उद्योजक वास्तविक विश्वातील वातावरणामध्ये आमच्या सर्वात प्रगत एआय-समर्थित नाविन्यतांशी संलग्न होऊ शकतात. स्मार्ट क्लासरूम्सपासून ऑटोमेटेड हॉटेल्सपर्यंत, सर्वोत्तम आरोग्यसेवा साधनांपासून पेपरलेस बँकिंगपर्यंत आम्ही डिजिटल परिवर्तन सक्षम करत आहोत, जे अर्थपूर्ण, कार्यक्षम असण्यासोबत मोठ्या प्रगतीसाठी डिझाइन करण्यात आले आहे. हा स्टुडिओ तंत्रज्ञानाला दाखवतो, तसेच या स्टुडिओमधून भारतातील व जगभरातील आमच्या सहयोगींसोबत सहयोगाने उद्योजकांचे भविष्य घडवण्याप्रती आमची कटिबद्धता देखील दिसून येते.”
राज्याचे आयटी व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले, “आम्ही डिजिटल भारत मिशनला गती देत असताना एआय व व्हीआर सारखे उदयोन्मुख तंत्रज्ञान उद्योगांच्या कार्यसंचालन करण्याच्या, संस्थांच्या सेवा देण्याच्या आणि नागरिकांच्या विश्वाचा अनुभव घेण्याच्या पद्धतींना नवीन आकार देत आहेत. मुंबई या परिवर्तंनामध्ये अग्रस्थानी आहे, तसेच नाविन्यता, सहयोग व भविष्यासाठी सुसज्ज परिसंस्थांना चालना देत आहे. सॅमसंगचा बिझनेस एक्स्पेरिअन्स स्टुडिओ या प्रवासामध्ये महत्वपूर्ण भर आहे, जो आमच्या व्यवसायामध्ये जागतिक तंत्रज्ञान नेतृत्व आणेल आणि डिजिटल नाविन्यतेसाठी आघाडीचे हब म्हणून महाराष्ट्राचे स्थान अधिक दृढ करेल.”
स्टुडिओत चार प्रमुख झोन्स आहेत:
झोन १: शिक्षण, रिटेल, फायनान्स आणि आरोग्य सेवा क्षेत्रासाठी स्मार्ट क्लासरूम्स, टॅबलेट्स, डिजिटल साइनजेस, सॉफ्ट POS, एअर क्वालिटी व्यवस्थापन, आणि हेल्थ डिव्हाइसेस.
झोन २: युनिफाईड AI सोल्युशन्स, स्मार्ट थिंग्ज प्रोद्वारे हॉटेल्स व मीटिंग रूम्स साठी स्मार्ट अनुभव; ‘द वॉल’ डिस्प्लेद्वारे ऑटोमोटिव्ह, गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट क्षेत्रांतील वापर.
झोन ३: मायक्रोवेव्ह, फ्रिज, एसी, वॉशिंग मशिन्स इ. सोल्युशन्स सहजीवन व स्टार्टअप्ससाठी उपयुक्त.
झोन ४: स्मार्ट होम, किचन, लिव्हिंग रूम्स आणि गेमिंग/होम सिनेमा सोल्युशन्स.
स्टुडिओ वेळ: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९ ते सायंकाळी ६.
हा स्टुडिओ व्यवसायांना आधुनिक तंत्रज्ञान अनुभवण्याची आणि नाविन्यपूर्ण बदल स्वीकारण्याची एक उत्कृष्ट संधी प्रदान करतो.